नात्याला कलंक : विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:41 AM2019-08-12T00:41:24+5:302019-08-12T00:43:22+5:30

घरातील सर्व माणसे कामावर गेल्याची संधी साधून सास-याने मुलीसमान सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघड झाली.

father-in-law sexual misbehave with Daughter in law | नात्याला कलंक : विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

नात्याला कलंक : विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

Next

वसई : सासरा - सुनेच्या नात्याला कलंक लागल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. घरातील सर्व माणसे कामावर गेल्याची संधी साधून सास-याने मुलीसमान सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. सुनेच्या तक्रारीवरुन सास-याच्या विरोधात विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लागलीच या वासनांध तसेच व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या आरोपीला गजाआड केले आहे.

सास-याच्या या कृत्याबाबत पती, सासू, दीर यांना सांगूनही तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नसल्याने कंटाळून सुनेने प्रसंगावधान राखत सास-याची ही विकृती मोबाइलच्या कॅमे-यात कैद केली आणि अखेर ही धक्कादायक घटना घरच्या लोकांसमोर उघड केली.
सविस्तर माहितीनुसार, आरोपी सासरा हा रिक्षाचालक असून तो पहाटे साडेतीनच्या सुमारास रिक्षा चालवायला जायचा. त्यानंतर पुन्हा सकाळी साडे आठ वाजता तो घरी यायचा. तो जेव्हा घरी येत होता, तेव्हा त्याची २२ वर्षीय सून घरी एकटीच असे.

महिन्याभरापासून हा सासरा आपल्या सुनेकडेच वाकड्या नजरेने बघत होता. त्यातच अलीकडे सास-याने आपल्या सुनेला स्पर्श करुन तिच्याशी जवळीक साधत होता. पण ही विवाहिता त्या वासनांध सास-याला विरोध करत होती.

शेवटी विरार पोलीस ठाण्यात सुनेने सास-याच्या विरोधात सर्व हकीकत तक्र ारीत नमूद केली. सुनेच्या तक्र ारीवरुन सास-याने विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी सास-याला बेड्या ठोकल्याचे विरारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल दबडे यांनी सांगितले.

अनेकदा सुनेने ही घटना सासू, पती आणि दीर यांना सांगितली. मात्र कुणाचाही यावर विश्वास बसला नाही. याउलट तिच्यावरच अविश्वास दाखवून तिला नांदायचे नसल्याने ती असे आरोप करीत असल्याचे तिला सांगत होते.

यामुळे शेवटी सुनेनेच शक्कल लढवून हा प्रकार मोबाइलमध्ये कैद करून सास-याचा भांडाफोड करण्याचे ठरवले. आता या घटनेला वाचा फुटली असून विवाहीत तरुणीने आपल्या मोबाइल कॅमे-यात सास-याची विकृती कैद केल्यानंतर हा सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. त्याचवेळी पती-सासू, दीर यांनाही सांगितले.

Web Title: father-in-law sexual misbehave with Daughter in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.