Father-in-law arrested for molesting minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सावत्र बापाला अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सावत्र बापाला अटक

शेगाव : दुसऱ्या बायकोच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावत्र बापाला शेगाव शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

शेगाव शहरातील अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१२ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले. तेव्हापासून अल्पवयीन मुलगी आईसोबतच सावत्र बाप असलेल्या व्यक्तीच्या घरीच राहत होती. आई कामानिमित्त बाहेर जात असताना तसेच कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे अल्पवयीन मुलगी घरीच राहत होती. त्यावेळी तिला सावत्र बाप वाईट नजर ठेवत असल्याचे लक्षात आले.

रात्री झोपेत असताना आरोपी हा पीडितेच्या बाजूला येऊन झोपत होता. तसेच तिच्या सोबत अश्लील चाळे करत होता. ही बाब पीडितेने आईला सांगितल्यावर तिला तिच्या आजीकडे पाठवून दिले. गुरुवारी पीडिता खासगी कामानिमित्त गांधी चौकातून जोगडी फैलकडे जात असताना आरोपी  याने तिचा विनयभंग केला. तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तसेच तत्काळ अटक करण्यात आली. अधिक तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

Web Title: Father-in-law arrested for molesting minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.