आईला वाचवण्यास गेलेल्या मुलीची दारूच्या आहारी गेलेल्या बापाने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 00:09 IST2019-07-10T23:58:24+5:302019-07-11T00:09:50+5:30
पोलिसांनी याप्रकरणी 37 वर्षीय कैलाश याला अटक केली आहे.

आईला वाचवण्यास गेलेल्या मुलीची दारूच्या आहारी गेलेल्या बापाने केली हत्या
मदुराई - आपल्या आईला वाचवण्यासाठी भांडणात पडणाऱ्या 7 वर्षीय चिमुकलीचे तिच्याच वडिलांकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी दारुच्या आहारी गेलेला असून घटनेच्या दिवशी देखील दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करत होता. आईला वडिलांकडून मारहाण होताना पाहून मुलगी वाचवण्यासाठी गेली. मात्र, आरोपी बापाने मुलीला इतकी मारहाण केली की बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी 37 वर्षीय कैलाश याला अटक केली आहे. तामिळनाडूमधील तिरुनेवेली जिल्ह्यात ही धक्कादायक घडली आहे. मुलीच्या आईने हत्येची ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनीही मुलीच्या आईला अटक केली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. मात्र, शेजाऱ्यांना संशय आला आणि मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. आरोपी आई वडिलांनी मृतदेह हॉस्पिटलमधून घरी नेला आणि ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. मुलगी छतावरुन पडल्याने जखमी झाली होती असा दावा त्यांनी केला. मंगळवारी त्यांनी अंत्यविधी करण्याची सगळी तयारी केली होती. मात्र संशय निर्माण झाल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. चौकशी केली असता सत्य समोर आलं आणि पोलिसांनी मृत मुलीच्या आई वडिलांना अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.