पित्यानेच दिले पोटच्या मुलाला गरम चमच्याने चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 04:37 IST2020-12-06T04:37:13+5:302020-12-06T04:37:54+5:30

Crime News : सहा वर्षांच्या मुलाने जेवताना लघुशंका केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी चमचा गरम करून मुलाच्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिल्याची तसेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात घडली आहे.

The father gave the child a hot spoonful | पित्यानेच दिले पोटच्या मुलाला गरम चमच्याने चटके

पित्यानेच दिले पोटच्या मुलाला गरम चमच्याने चटके

 कल्याण : सहा वर्षांच्या मुलाने जेवताना लघुशंका केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी चमचा गरम करून मुलाच्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिल्याची तसेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी वडील सचिन कांबळे याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वडिलांनी पोटच्या मुलाच्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिले. त्यामुळे त्याला बसताना वेदना होत होती. त्याने ही बाब सांगितली. त्यावर वडिलांनी असे का केले? असे मुलाला विचारले असता तो म्हणाला, की, ‘जेवताना मला लघुशंका आली. ती मला रोखून धरता आली नाही. त्यामुळे मी लघुशंका केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी मला मारहाण सुरू केली. तसेच घरातील चमचा गरम करून माझ्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिले. 

पोलिसांचेही हृदय हेलावले
सचिन हा मुंबई महापालिकेत कामाला आहे. त्याची तीन लग्ने झाली आहेत. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर त्याने दुसरी पत्नी केली. दुसऱ्या पत्नीचेही निधन झाले. जखमी मुलगा हा दुसऱ्या पत्नीचा आहे. दुसऱ्या पत्नीचे निधन झाल्यावर सचिनने तिसरे लग्न केले आहे. बापाची क्रूरता पाहून पोलिसांचेही हृदय हेलावले.

Web Title: The father gave the child a hot spoonful