नालासोपाऱ्यातील ह्रदयद्रावक घटना; तीन मुलींची हत्या करुन पित्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 09:02 IST2020-06-28T04:14:34+5:302020-06-28T09:02:41+5:30
जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या तीन मुलींची हत्या करून स्वत:चीही जीवनयात्रा संपवली तर सहा महिन्यांपूर्वीच या मुलांची आई त्याच्यापासून वेगळी झाली होती.

नालासोपाऱ्यातील ह्रदयद्रावक घटना; तीन मुलींची हत्या करुन पित्याने केली आत्महत्या
वसई - आपल्या पोटच्या तीन मुलींची गळा चिरून हत्या केलेल्या जन्मदात्या बापाने स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली आहे,या घटनेनंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील डॉन लेन, बाबुलपाडा येथे पिता कैलास विजू परमार (35 ) हा आपल्या कु. नयन परमार (12 ) , कु.नंदिनी परमार (7 ) आणि कु.नयना परमार (3 ) या तीन मुलींसह राहत होता. मात्र सहा महिन्यापूर्वी कैलासची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत असल्याने घरामध्ये तो आपल्या तिघा मुलीसोबत राहत होता. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा 10,30 च्या सुमारास कैलास परमार याने चक्क आपल्या तीन मुलींची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली आहे. परिणामी या हत्येमागचे नेमके कारण अजूनही समजू शकले नसून तुळींज पोलीस अधिक तपास करत आहेत.
तर या घटनेनंतर सर्वत्र परिसरात खळबळ उडाली असून तीन चिमुकल्यांचा जीव नेमका काय बोलला असेल याबाबत ही हळहळ व्यक्त केली जात आहे.