शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत असताना नवविवाहित लेकीवर बापाने केला बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 16:09 IST

Attempting to rape : घरात झोपेत असताना बापाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठळक मुद्देआता आम्ही तिचे भारतीय दंड संहिता [IPC] कलम १६४ अंतर्गत तिचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात हजर करू. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले, " अशी पोलिसांनी माहिती दिली. 

नवी दिल्ली - पोटच्या नवविवाहित मुलीवर बापाने  बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात सोमवारी ही लज्जास्पद घटना घडली. आरोपी बापाच्या लेकीचे नुकतंच लग्न झालं होतं आणि आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली होती. घरात झोपेत असताना बापाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घऱात झोपलेली असताना आरोपी वडील मद्यप्राशन करुन आले होते. यावेळी त्याने चुकीच्या पद्धतीने विवाहित आपल्या पोटच्या मुलीला स्पर्श केला. तसेच मुलीला आरडाओरडा न करण्यास धमकावलं. मात्र, मुलीने आरडाओरडा करत आपल्या आईला झोपेतून उठवलं.

पीडित मुलीने पोलिसांना माहिती देताना याअगोदर आपल्या वडिलांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले असून त्याबाबत वाच्यता केली नव्हती असं तिने सांगितले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक केली तेव्हा त्याने मद्यप्राशन केले होते. त्याच्या पत्नी आणि मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. पीडित मुलीचे नुकतेच दूरच्या नातेवाईकाशी लग्न झाले होते. आता आम्ही तिचे भारतीय दंड संहिता [IPC] कलम १६४ अंतर्गत तिचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात हजर करू. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले, " अशी पोलिसांनी माहिती दिली. 

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय