शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

संतापजनक! केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्याची दादागिरी; पोलीस ठाण्यात तरुणाला केली बेदम मारहाण; डोकंच फोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 12:55 IST

Union Minister Krishan Pal Gurjar Nephew Amar Choudhary : केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे. पोलीस ठाण्यात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचं डोकंच फोडलं आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान फरीदाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे. पोलीस ठाण्यात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचं डोकंच फोडलं आहे. यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर (Union Minister Krishan Pal Gurjar) यांचा भाचा अमर चौधरी (Amar Choudhary) याची दादागिरी पाहायला मिळाली आहे. 

अमर चौधरी याने एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. संतापजनक बाब म्हणजे पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. फरीदाबादच्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा तरुण एक इंजिनिअर असून ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करतो. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, तो मंत्र्याच्या भाच्याच काम करायचा. अमर चौधरी त्याच्याकडून गाड्यांची डिलिव्हरी लवकर तसेच गाड्यांवर डिस्काऊंट घ्यायचा. 

तरुणाने काही कामानिमित्त मंत्र्याच्या भाच्याला फोन केला होता. मात्र त्यांनी तरुणाचं ते काम केलं नाही. त्यानंतर तरुणाने मी यापुढे तुम्हाला कोणतंच काम सांगणार नाही असा मेसेज टाईप करून चौधरी याला पाठवला. तरुणाचा मेसेज पाहून भाचा चांगलाच संतापला. त्य़ाने फरीदाबादच्या सेक्टर 28 मधील पोलिसी चौकीत तरुणाला बोलावून घेतलं आणि आपल्या मित्रांच्या मदतीने तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. हैराण करणारी बाब म्हणजे पोलिसांसमोर पोलीस ठाण्यातच तरुणाला मारहाण करून त्याचं डोकं फोडण्यात आलं आणि तो जखमी झाला. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

"मुख्यमंत्रीजी, बेरोजगार असल्याने मी आत्महत्या करतोय; तरुणांना रोजगार द्या"; Video जोरदार व्हायरल

मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. या तरुणाने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र पाठवलं आहे. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने "मुख्यमंत्रीजी, माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करत आहे" असं म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेरोजगार तरुणाच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी येथे राहणाऱ्या कुंदन राजपूतने 10 जुलै रोजी इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वीचा कुंदनचा व्हिडीओ आणि सुसाईड नोट आता समोर आली असून ती जोरदार व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndiaभारतhospitalहॉस्पिटल