सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 00:15 IST2019-08-12T00:11:52+5:302019-08-12T00:15:55+5:30
सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक
मुंबई - सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक करण्यात आली आहे. सावत्र मुलीला उद्देशून अश्लील बोलल्याचा आणि अश्लील छायाचित्रे दाखवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणात समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी या व्यक्तीशी विवाह केला होता. या अभिनेत्रीला पहिल्या पतीपासून असलेली मुलगीही तिच्यासोबत राहत होती. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या अभिनेत्रीचा दुसरा पती त्याच्या सावत्र मुलीशी अश्लीस संभाषण करून तसेच अश्लील फोटो दाखवून गैरवर्तन करत होता. अखेर आज या अभिनेत्रीने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंवि कलम 354 अ, 323, 504, 506, 509, 67 अ आयटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या पतीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.