बंगळुरु - प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रसाद बिडप्पा यांचा मुलगा ॲडम बिडप्पा याला कन्नड चित्रपट अभिनेत्रीला अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. ही अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पोलिसात तक्रार दाखल करताना अभिनेत्री म्हणाली- मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. एका व्हीव्हीआयपीच्या मुलाने माझ्यावर व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता त्याने मला ते अश्लील संदेश पाठवले तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता.अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 'त्याचे मेसेजेस अपमानास्पद, धक्कादायक, घृणास्पद आणि खूप दुखावणारे आहेत. यामुळे गेल्या आठवडाभरात मला खूप मानसिक त्रास झाला आहे. मी सात महिन्यांची गरोदर आहे. नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून मी दूर आहे.