Family discovered drugs inside daughter's glow worm doll in America | बाबो! मुलीसाठी खरेदी केलं सुंदर खेळणं, आतून जे निघालं ते पाहून उडाली त्यांची रात्रीची झोप!

बाबो! मुलीसाठी खरेदी केलं सुंदर खेळणं, आतून जे निघालं ते पाहून उडाली त्यांची रात्रीची झोप!

घरात लहान मुलं असली की, खेळण्यांचा ढीग लागलेला असतो. पालक किंवा मुले दुकानात जे आवडलं ते खेळणं घेतात. आता खेळणं हे खेळणं त्याला कोण कशाला उघडून बघतं. पण अमेरिकेतील (America) च्या एरिजोना (Arizona) मध्ये राहणाऱ्या एका कपलने आपल्या मुलीसाठी एक ग्लो वर्म बाहुली (Glow Worm Doll) खरेदी केली होती. पण त्या खेळण्याने सर्वांची झोप उडवली. 

अमेरिकेतील (America) एरिजोना (Arizona) मध्ये फीनिक्स (Phoenix) मध्ये राहणाऱ्या एका कपलने त्यांच्या मुलीसाठी हिरव्या रंगाची एक सुंदर बाहुली खरेदी केली होती. मुलीने खेळल्यानंतर त्यांनी जेव्हा बाहुली धुतली तेव्हा त्यातून असं काही निघालं की, त्यांची रात्रीची झोप उडाली. या ग्लो वर्म डॉलच्या आत एक सॅंडविच बॅग होती. ज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स(Drugs) होतं. 

कपलला बाहुलीच्या आत ड्रग्स दिसलं तर ते आधी घाबरले. त्यांनी लगेच फीनिक्स पोलिसांना सपंर्क केला आणि याबाबत माहिती दिली. कपलने सांगितले की, त्यांनी एक खेळणं एल मिराजमधील एका दुकानातून खरेदी केलं होतं. ते धुतल्यावर त्यांना दिसलं की, त्यातून फेंटनाइल नावाचं ड्रग आहे. त्यात ड्रगच्या एक किंवा दोन गोळ्या नाही तर तब्बल ५ हजार गोळ्या होत्या. 

पोलिसांनी बाहुलीतील ड्रग्स ताब्यात घेतलं आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. बाहुलीत इतकं ड्रग्स आलं कुठून याचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेवरून हेही दिसून येतं की, लहान मुलांसाठी खेळणी घेताना किती काळजी घ्यावी लागते. एका छोटीशी चुकही महागात पडू शकली असती.
 

Web Title: Family discovered drugs inside daughter's glow worm doll in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.