शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

टोरंटोमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, मृतदेह आणण्याची दूतावासाकडे कुटुंबाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 20:04 IST

Ghaziabad student shot dead in canada capital toronto : विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्याची मागणी वडील आणि इतर कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाकडे केली आहे.

कॅनडातील टोरंटो येथे ग्लोबल मार्केटिंगचा अभ्यास करणाऱ्या कार्तिक वासुदेव या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वडील हितेश वासुदेव यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी टोरंटोमधील एका रेस्टॉरंटबाहेर ही घटना घडली. कार्तिक बेपत्ता झाल्याची माहिती मित्रांनी कुटुंबीयांना दिली होती. विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्याची मागणी वडील आणि इतर कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाकडे केली आहे.हितेश वासुदेव एका आयटी कंपनीत अभियंता आहे. त्यांनी सांगितले की, मुलगा कार्तिक 4 जानेवारी रोजी कॅनडातील टोरंटो येथे जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी गेला होता. तो एका रेस्टॉरंटमध्ये अर्धवेळ नोकरीही करत होता. कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर तो थेट फ्लॅटवर पोहोचायचा आणि मग दुपारी रेस्टॉरंटमध्ये काम करायचा.गुरुवारी तो रेस्टॉरंटमधून बाहेर पडला तेव्हा तो एका भुयारी मार्गाजवळ उभा होता. त्यानंतर एकाने विद्यार्थ्यावर गोळी झाडली. लोकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, तेथे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांची अवस्था दयनीय झाली आहे. घरातील सदस्यांकडून फोनवरून घटनेची माहिती घेऊन शेजारी आणि नातेवाइकांचे सांत्वन केले जात आहे. हितेश वासुदेव सांगतात की, कॅनडाच्या पोलिसांशी संपर्क साधून ते भारतीय दूतावासाच्या मदतीने विद्यार्थ्याचा मृतदेह लवकरच घरी आणतील.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसCanadaकॅनडाDeathमृत्यू