मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:22 IST2025-04-14T10:20:13+5:302025-04-14T10:22:07+5:30

आधीसारखा इतरांमध्ये मिसळून राहणारा राहुल आता गप्प गप्प राहत होता असं त्याच्या वडिलांनी आरोप केला.

Family alleges mother-in-law used witchcraft to subdue son and fled in Aligarh, Uttar Pradesh | मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 

मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 

उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे सासू आणि जावयाच्या लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे पोलीस या दोघांचा शोध घेत आहे तर दुसरीकडे मुलाच्या कुटुंबीयांकडून सासूवर जादूटोणा करून मुलाला ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या दोघांची लव्ह स्टोरी लग्नाची बोलणी सुरू झाल्यापासून झाली होती. सासू मुलाच्या घरी आली होती तेव्हा तिने मुलाला तावीज बांधून वशीकरण केले असं मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे.

सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती 

मछलिया गावात राहणाऱ्या राहुलचं मनोहरपूर येथे राहणाऱ्या जितेंद्र यांच्या मुलीसोबत लग्न ठरलं होते. दोघांच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्यातच लग्नाला ८ दिवस शिल्लक असताना नवरदेव सासूला घेऊन घरातून पळाला. त्यानंतर दोघांच्या घरच्यांना धक्का बसला. आता राहुलचे वडील ओमवीर यांनी यावर प्रतिक्रिया देत सासूवर गंभीर आरोप लावले आहेत. राहुलचे वडील म्हणाले की, होळीच्या आधी मुलाची सासू आमच्या घरी आली होती. ती ५ दिवस इथेच थांबली. त्यानंतर घरातील सर्व काही बदलायला लागले. सासूने राहुलच्या शरीरावर तावीज बांधले होते. एक तावीज त्याच्या हातावर आणि दुसरे कमरेला बांधले होते. तावीज बांधल्यापासून राहुलच्या वागणुकीत बदल झाला. तो कुटुंबापासून अंतर बाळगत होता. आधीसारखा इतरांमध्ये मिसळून राहणारा राहुल आता गप्प गप्प राहत होता असं त्याच्या वडिलांनी आरोप केला.

राहुलच्या डोळ्यात एकटेपणा आणि चेहऱ्यावर परकेपणा दिसत होता. हे बदल नेमके कशामुळे झालेत हे कुटुंबाला कळले नाहीत. परंतु सासू आल्यापासून त्याच्यात बदल झाले ते वडिलांना दिसले. सासूने मुलावर जादूटोणा केला त्यामुळे मुलगा तिच्या ताब्यात गेला. त्याच्यावर वशीकरण करण्यात आले होते. राहुल घरच्यांचे ऐकायचे मात्र सासू घरी आल्यापासून तो पूर्णत: बदलला होता. माझा मुलगा घरातून ५० हजार आणि दागिनेही घेऊन पळून गेला असंही राहुलचे वडील ओमवीर यांनी म्हटलं.

दरम्यान, माझा मुलगा आता माझ्यासाठी मेलाय, मी त्याला संपत्तीतून काढून टाकलंय. आम्ही त्याला घरातही पाऊल ठेवू देणार नाही. त्याने जे काही केले सासूमुळे केले असा आरोप राहुलच्या वडिलांनी केला. तर माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या होत्या. लग्नाच्या ८ दिवस आधीच सासूसोबत होणार जावई पळाला. आम्ही दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नी घरातील ५ लाखांचे दागिने आणि ३ लाख रोकड घेऊन पळाल्याचा आरोप मुलीचे वडील जितेंद्र कुमार यांनी केला आहे.
 

Web Title: Family alleges mother-in-law used witchcraft to subdue son and fled in Aligarh, Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.