परदेशात नव्हते जायचे म्हणून गुजरातच्या इंजिनिअरने बनवला बनावट व्हिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:58 IST2019-07-26T18:55:53+5:302019-07-26T18:58:16+5:30
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

परदेशात नव्हते जायचे म्हणून गुजरातच्या इंजिनिअरने बनवला बनावट व्हिसा
मुंबई - बनावट व्हिसाद्वारे परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २३ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरला मुंबई विमानतळावरअटक करण्यात आली आहे. मलय दावरा असं या आरोपीचं नाव आहे. त्याचा ताबा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा कक्ष ८ कडे दिला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
गुजरातचा रहिवाशी असलेल्या मलयने सुरतमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, त्याचे कुटुंबीय पुढील शिक्षणासाठी त्याला परदेशात पाठवण्यासाठी आग्रही होते. त्यासाठी घरातल्यांनी यूसएमधील एका नामांकीत काॅलेजमध्येही अर्ज केला होता. काॅलेजकडून परीक्षेसाठी बोलवण्यातही आले होते. त्याला परदेशात शिक्षणासाठी जायचे नव्हते. मात्र, घरच्यांच्या दबावाखाली त्याचे काहीही चालत नव्हते. अखेर घरातल्यांच्या दबावाखातर कंटाळून त्याने घरातल्यांची फसवणूक करण्यासाठी बनावट व्हिसा त्याने बनवला. बनावट व्हिसा आणि पासपोर्टसह मलय विमानतळावर गेला असताना तपासणीदरम्यान त्याचा व्हिसा बनावट असल्याचं आढळलं. त्यामुळे सुरक्षा विभागाने त्याला अटक केली.