शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

खेड परिसरात चोरांच्या अफवांना उधाण ; नागरिक, पोलिसांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 17:05 IST

होलेवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी ,खरपुडी ,रेटवडी या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून चोरटे आल्याच्या अफवा पसरवत आहेत.

राजगुरुनगर : लांडगा आला रे आला... ही गोष्ट आपण लहानपणी शाळेत असताना प्रत्येकाने ऐकली असेल, मात्र सध्या या गोष्टीचा प्रत्यय खेड तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांना येत आहे. गेल्या १५ दिवसांपासुन चोरटे आल्याच्या मोठ्या अफवा परिसरात पसरत आहे. चोरटे या गावातून त्या गावात गेले. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत.,त्या चोरट्यांनी अंगाला तेल लावल्याचे संदेश व्हाट्सअपवर फिरत आहेत. त्यामुळे चोरटे आल्याच्या अफवा नागरिकांमध्ये पसरवून भीती निर्माण करण्याचे काम सुरु असून नागरिक, पोलीस रात्र-रात्र जागून पहारा देत आहे. 

होलेवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी ,खरपुडी ,रेटवडी या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून चोरटे आल्याच्या अफवा आहेत. रात्री आठ साडेआठ वाजता चोरटे आल्याचे फोन पोलिसांना येत आहेत .पोलीस घटनास्थळी दाखल होतात .पोलीस घटनास्थळी जाताच चोरटे पळून गेल्याचे नागरिकांनकडून सांगितले जाते. या दिशेने गेले, त्या दिशेने गेल्याचे पोलिसांना सांगितले जाते. पोलीस पाठलाग करता मात्र कोणी आढळून येत नाही. रात्री बारा ते एक वाजेपर्यंत गावागावात  लांऊडस्पीकरवरुन चोरटे आल्याचे नागरिकांना सांगितले जात आहेत. त्यामुळे महिला व लहान मुले या भीतीने भयभयीत झाली आहे. धारदार हत्यारे घेऊन ५ ते १० जणांचे टोळके आले नागरिकांनी पकडू नये म्हणून त्यांनी अंगाला तेल लावले आहे. त्याच्याकडे धारदार शस्त्रे आहे. गावातील लाईट बंद करून चोऱ्या करत आहे, अशी अफवा गेल्या १५ दिवसांपासुन सोशल मीडियावर अफवा येत आहे. सोशल मीडियावर संदेश आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नागरिक रात्र रात्र जागून काढत आहे. गेल्या पंधरा दिवसात अशा प्रकारे चोरी झाल्याच्या खेड पोलिस ठाण्यात फक्त दोन गुन्हे दाखल आहेत.

खेड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी म्हणाले, खेड तालुक्याच्या पुर्व भागात थिटेवाडी , टाकळकरवाडी (ता खेड ) या परिसरात चोरीच्या घटना घडली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश येत असल्याने नागरिकही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चोरीच्या अफवा जास्त प्रमाणात पसरतात तेव्हा प्रकार खरा की खोटा याची खात्री करून मगच असे संदेश पुढे पाठवा, अपवा करणारे असे मेसेज येतात तेव्हा जनतेमध्ये घबराट निर्माण होते. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये. अफवा पसरविणाऱ्या संशयितांवर सायबर सेलची कडक नजर असून, अशा व्यक्तींवर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल. 

......................................................................कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास गावातील पोलिस पाटील किंवा पोलिस ठाण्यात संपर्क करावा, चोरटे आल्याच्या केवळ अफवा आहेत. रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असते नागरिकांना माझा आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक दिला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवले आहे .चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून यावर विश्वास ठेवू नये.- आत्माराम डुंबरे (पोलिस पाटील, दावडी )

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीThiefचोर