शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

डीजीपी संजय पांडे यांचे फेक फेसबुक प्रोफाईल;सायबर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 19:21 IST

Fake Facebook profile of DGP Sanjay Pandey : अखेर दुबे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली.

ठळक मुद्दे25 जूनला दुबे यांना प्रथम फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर या बनावट प्रोफाईलवरून तीनवेळा दुबे यांना फ्रेंड रिक्वेस्ट आली.

मुंबई -  राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनावणाऱ्याला राज्य सायबर विभागाने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. महफुज अझीम खान (21) असं या आरोपीचं नाव आहे. वकील अटलबिहारी दुबे यांच्या तक्रारीवरून सायबर विभागाने ही कारवाई केली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आयपी एड्रेसच्या मदतीने आग्रातून सवन अझीम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचा मुलगा महफुज खान त्याच्या नावावरील मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी सायबर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर त्याला कलम 41(ड) अंतर्गत नोटीस पाठवून सायबर विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सोमवारी सांगण्यात आले होते. तेथे आल्यानंतर आरोपीनेच पांडे यांच्या नावाची बनावट प्रोफाईल तयार केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणी सायबर तोतयागिरी केल्याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. तेथे न्यायालयाने त्याला 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार दुबे यांना या बनावट फेसबुक प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. पण महासंचालक पांडे फेसबुकवर दुबे यांचे फ्रेंन्ड होते. त्यानंतरही नव्या प्रोफाईलवरून त्यांना रिक्वेस्ट आल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पांडे यांच्याकडे विचारणा केली असता ती फेसबुक प्रोफाईल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अखेर दुबे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. सायबर पोलिसांंनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

25 जूनला दुबे यांना प्रथम फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर या बनावट प्रोफाईलवरून तीनवेळा दुबे यांना फ्रेंड रिक्वेस्ट आली. आरोपीने अशा प्रकारे किती व्यक्तीना रिक्वेस्ट पाठवली. महासंचालकांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल बनवण्याचे नेमके कारण काय?, याबाबत सायबर विभाग आरोपीकडे अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपीने यापूर्वीही अशाप्रकारे सायबर गुन्हा केला आहे का? याबाबतची तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकcyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुक