शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

पत्नी म्हणून रुग्णालयात दुसरीलाच नेले; गर्भपातासाठी आलेल्या जोडप्याचे बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 5:25 AM

वडूजमध्ये खळबळ : पत्नी म्हणून रुग्णालयात नेले दुसरीलाच

वडूज (जि. सातारा) : पती-पत्नीचे खोटे नाते कागदोपत्री तयार करून एक जोडपे गर्भपात करण्यासाठी मंगळवारी वडूजमधील एका खासगी रुग्णालयात आले. मात्र, डॉक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर वडूज पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी बोगस जोडपे रुग्णालयात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूज येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी भांडवलकर नावाचे जोडपे तपासणीसाठी आले. संजय भांडवलकर (रा. पाचवड, ता. माण) याने त्याची पत्नी गर्भवती असून, ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे आम्हाला सध्या अपत्य नको असल्याचे डॉ. वेदिका माने यांना सांगितले. डॉ. माने यांनी संबंधित महिलेची सोनोग्राफी केली असता तीन महिन्यांचा गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना दुसºया दिवशी बुधवारी रुग्णालयात येण्यास सांगितले.

दुपारी भांडवलकर दाम्पत्य रुग्णालयात पुन्हा आले. त्यांना आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्ष दिसण्यावरून व आधारकार्डवरील माहितीवरून यात तफावत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तसेच डॉ. वेदिका माने यांचे पती डॉ. विवेकानंद माने हे संजय भांडवलकर यांचा मेव्हणा राजेश सुतार यांना ओळखतात. त्यामुळे साहजिकच संजय भांडवलकर याच्या पत्नीलाही ते ओळखत होते. हा प्रकार भलताच असल्याचे डॉ. विवेकानंद यांना समजल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.महिलेची प्रकृती बिघडली..पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोघेही पती-पत्नी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करून भांडवलकरला अटक केली. तर संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Abortionगर्भपातSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस