मुंबईत दहशतवादी घुसल्याचा फेक कॉल, अहमदनगरमधून एकाला अटक!
By अण्णा नवथर | Updated: April 14, 2023 15:51 IST2023-04-14T15:51:22+5:302023-04-14T15:51:39+5:30
यासिन याकुब सय्यद ( भावानीनगर, अहमदनगर ) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

मुंबईत दहशतवादी घुसल्याचा फेक कॉल, अहमदनगरमधून एकाला अटक!
अहमदनगर: दुबई येथून पहाटे दोन दहशतवादी मुंबईत आले असून, त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. त्यातील एकाचे नाव मुजिब मुस्ताफा सय्यद आहे, अशी खोटी माहिती देणाऱ्या एकास दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी अहमदनगर येथून अटक केली. यासिन याकुब सय्यद ( भावानीनगर, अहमदनगर ) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, अशी मुंबई येथील नियंत्रण कक्षात शुक्रवारी (दि. ७) राजा ठोगे असे नावाची व्यक्ती बोलतो आहे, असे सांगून मुंबईत अतिरेकी उतरले आहेत, अशी माहिती दिली. त्याने आपण पुण्यावरून बोलत असल्याचे सांगितले होते. याबाबत मुंबई येथील अझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास दहशतवादीविरोधी पथकाने नाशिक विभागाकडे सोपविला. नाशिक येथील पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता मुजिब मुस्ताफा सय्यद याचा चुलत भाऊ यासिन याकुब सय्यद याने मुंबई येथील नियंत्रण कक्षात खोटी माहिती दिल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपी यासिन यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने खोटी माहिती दिल्याची कुबली दिली. आरोपी व मुजिब मुस्ताफा सय्यद यांच्यात जमीनीवरून वाद सुरू असल्याने त्याने हा कॉल केला असल्याचे सांगितले.