शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बनावट जामीनदार व कागदपत्रे उभे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:03 PM

एजंट व जामीनदार अशा १० जणांना अटक , काही वकिलांचाही सहभाग असल्याची शक्यता

ठळक मुद्दे१० जणांना अटक : खंडणीविरोधी पथकाची कारवाई वकील, एजंट आणि जामीनदार अशी त्यांची एक साखळी असल्याचे तपासात पुढे बनावट जामीनदाराचे दर ठरलेले

पुणे : बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करून त्याद्वारे बनावट जामीनदार न्यायालयापुढे उभे करून आरोपींना जामीन मिळवून देणाºया टोळीचा पर्दाफाश खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे़. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे़. त्यांच्याकडून १३ आधारकार्ड व १५ रेशनकार्ड जप्त केली आहेत़.पूनम बाळू कांबळे (वय २७, रा़ पिंपळे गुरव), तैहसिन अर्शद जहागिरदार (वय ३८, रा़ चिखली), मन्सूर महंमद नायकवडी (वय ३०, रा़ निगडी), सागर मुकुंद गायकवाड (वय २८, रा़ निगडी), संतोष रघुनाथ अहिवळे (वय ३४, रा़ पिंपरी), संजय साहेबराव ढावरे (वय ५०, रा़ निगडी), देवानंद गोपाळराव गुट्टे (वय २८, रा़ जि़ परभणी), सुनील मारुती गायकवाड (वय ४०, रा़ पिंपरी), विजय मारुती भारसकर (वय ४०, रा़ पिंपरी), अविनाश भानुदास बनसोडे (वय २८, रा़ चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व उपायुक्त बच्चनसिंग यांनी शासकीय कार्यालयात बनावट कागदपत्रांचा वापर होत आहे, अशी बनावट कागदपत्रे बनविणाºया लोकांवर कारवाई करावी, असे आदेश दिले होते़. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक माहिती गोळा करीत असताना काही जण शिवाजीनगर न्यायालयात बनावट सात-बारा उतारा, रेशनकार्ड, आधारकार्ड बनवून चोरी, जबरी चोरी, घरफोडी या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीसाठी जामीन करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करत असल्याची माहिती मिळाली़. त्याआधारे पोलिसांनी कामगार पुतळा येथे छापा टाकून १० जणांना पकडले़. या आरोपींना आतापर्यंत प्रत्येकी ३ ते ४ जणांना जामीन मिळवून दिल्याची चौकशीत पुढे आले आहे़. अधिक तपास एन. व्ही. महाडिक करीत आहेत़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, किशोर, तनपुरे, कर्मचारी अविनाश मराठे, भाऊसाहेब कोंढरे, प्रसाद मोकाशी, रमेश गरुड, पांडुरंग वांजळे, प्रमोद मगर, हनुमंत गायकवाड, सुनील चिखले, विजय गुरव, उदय काळभोर, महेश कदम, मनोज शिंदे, सचिन कोकरे, मंगेश पवार, अमोल पिलाने, संदीप साबळे, प्रवीण पडवळ, नारायण बनकर, रूपाली कर्णवर यांनी ही कामगिरी केली आहे़. ...........

काही वकिलांचाही सहभाग असल्याची शक्यता टोळीतील काही जण आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क करत असे़ त्यांना आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन खोटे आधारकार्ड, रेशनकार्ड, सातबारा तयार करून घेत़. त्यानंतर या जामीनदारांना न्यायालयात उभे करुन ते खरे असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक करीत असत़. यामध्ये प्रामुख्याने जो जामीनदार असे त्याच्या आधारकार्डावर फोटो असे़ बाकी नाव, पत्ता हे बनावट असे़ त्यानंतर त्याच नावाने रेशन कार्ड तयार करीत असत़. त्यानंतर ते काही वकिलांना सांगून ही आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे जामीनदाराला व कागदपत्रे घेऊन जात़. ..........ही कागदपत्रे बनावट असल्याची माहिती या वकिलांना असतानाही त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे सांगण्यात आले़. या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी काही वकिलांची नावे सांगितली असून त्यांचे व्हिजिटिंग कार्डही पोलिसांकडे दिली आहेत़.......

वकिलांवर केव्हा होणार कारवाई?पुणे : एजंटामार्फत बनावट कागदपत्रे तयार करुन बनावट जामीनदार आहेत, हे माहिती असतानाही काही ठराविक वकील न्यायालयाची दिशाभूल करून आरोपींचा जामीन करून देत असल्याचे खंडणीविरोधी पथकाच्या कारवाईत पुढे आले आहे़. एजंट व जामीनदार अशा १० जणांना अटक केली आहे़. मात्र, ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे़ हे जामीनदार व कागदपत्रे खोटी असल्याची माहिती असतानाही ते न्यायाधीशांची दिशाभूल करत होते. त्यांच्यावर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे़. खंडणीविरोधी पथकाने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट जामीनदार म्हणून उभे राहणाºयांना अटक केली आहे़. त्यातील काही जण एजंट म्हणून काम करत होते़. वकील, एजंट आणि जामीनदार अशी त्यांची एक साखळी असल्याचे तपासात पुढे येत आहे़. आरोपीच्या नातेवाईकांनी वकिलांशी संपर्क साधल्यावर ते पैसे घेऊन एजंटला दोन जामीनदार आणायला सांगत़. .......बनावट जामीनदाराचे दर ठरलेलेअशा प्रकरणात जामीनदार २ हजार रुपये, सातबारा उतारा तयार करणे, आधारकार्ड तयार करणे, रेशनकार्ड तयार करणे या साठी प्रत्येकी ५०० रुपये घेतले जात असत़  आपल्याकडे आलेला जामीनदार व त्याची मिळालेली कागदपत्रे ही बनावट आहेत, याची माहिती असतानाही हे ठराविक वकील त्यांना न्यायालयासमोर उभे करून ते खरे आहेत, हे सांगून न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले आहे़ या वकिलांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयadvocateवकिलfraudधोकेबाजी