शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंधाने महिलेचा जीव घेतला; प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 20:35 IST

An extramarital affair took the life of a woman :उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.अधिक तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ठळक मुद्देपुजा निलकुमार बागडे (  पुजा रवींद्र सलामे ) (२७) असे मृतक महिलेचे तर विवेक ब्रम्हदास चौधरी (२६) रा.चिखलपरसोडी असे आरोपीचे नाव आहे.

नागभीड(चंद्रपूर) - प्रियकराकडून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी नागभीड येथील मध्यवस्तीत सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.या घटनेने नागभीड येथे खळबळ उडाली आहे.             

पुजा निलकुमार बागडे (  पुजा रवींद्र सलामे ) (२७) असे मृतक महिलेचे तर विवेक ब्रम्हदास चौधरी (२६) रा.चिखलपरसोडी असे आरोपीचे नाव आहे. मृतक पुजा ही चवडेश्वरी मंदिर परिसरात आपल्या आईसोबत भाड्याचे घरी राहत होती.पुजाचे लग्न काही वर्षापूर्वी चिखलपरसोडी येथील निलकुमार बागडे नामक व्यक्तीशी झाले होते.पण फारकत झाल्याने पुजा आईसोबतच नागभीड येथे राहायला आली होती. पुजाचा पती आणि विवेक हे एकाच गावचे असल्यामुळे  त्यांचे संबंध होते.त्यामुळे विवेकचे पुजाशी प्रेमसंबध होते . यामुळे विवेकचे पुजाच्या घरी जाणे येणे होते. विवेक हा पुजाला नेहमीच लग्नासाठी तगादा लावत होता, असे पुजाची आई इंदू सलामे हिने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.             

याच कारणावरून शुक्रवारी पुजा आणि विवेकचे जोरदार भांडण झाले होते.या भांडणाचा डूख आरोपीच्या मनात होता.शनिवारी पुजाची आई शौचास गेल्याची संधी साधून आरोपीने  मागील दरवाजातून घरात प्रवेश केला व पुजाला खाली पाडून चाकूने मान चिरून काढली.क्षणार्धात पुजा रक्ताच्या थारोळ्यात पडली.अती रक्तस्त्राव झाल्याने पुजा जागीच गतप्राण झाली.विवेकचे हे अमानुष कृत्य सुरू असतांना शौचास गेलेल्या पुजाच्या आईला किंचाळी ऐकू आल्याने ती लगबगीने घरात गेली असता चाकू कमरेला खोचून विवेक मागील दाराने पळून गेला.पुजाची आई इंदू हिने लागलीच पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठले व पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात रवाना केला.दरम्यान आरोपी विवेक याने घटनेनंतर काही वेळातच पोलिसांपुढे आत्मसमर्पन केले.

नागभीड पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२,४५२ सहकलम ३ (२) (व्ही), अ.जा.ज.अ.प्र.का.१९८९  अन्वये गुन्हा दाखल क) केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.अधिक तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी