शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

व्यापाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी देत खंडणी उकळणाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 9:42 PM

पैशांच्या हव्यासापोटी या दोघांनी हे कृत्य केल्याचे कबूली जबाब पोलिसांना दिला आहे. 

ठळक मुद्दे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखा कक्ष -१२ कडे वर्ग करण्यात आला. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई -  दहिसर परिसरातील व्यापाऱ्याची गाडी चोरून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष १२ च्या पोलिसांनीअटक केली आहे. पैशांच्या हव्यासापोटी या दोघांनी हे कृत्य केल्याचे कबूली जबाब पोलिसांना दिला आहे. दहिसर परिसरात व्यापाऱ्याचा व्यवसाय असून त्याच्याकडे आरोपी चालक हा कामाला होता. दररोज व्यापाऱ्यासोबत फिरत असल्याने चालकाने व्यापाऱ्याकडून होणाऱ्या पैशाची मोठी उलाढाल पाहिली होती. त्यानुसार हव्यासापोटी मित्रांच्या मदतीने व्यापाऱ्याला गंडा घालण्याचं ठरवलं. त्यानुसार चालकाने व्यापाऱ्याची महागडी गाडी पळवून त्याच्याजवळ दीड लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास गाडी भंगारात तोडण्यासाठी देण्याची चालक धमकी देऊ लागला. त्यानुसार मालकाने दीड लाखांचा चेक दिला. एवढ्यावरच न थांबता त्या चालकाने मित्राच्या मदतीने व्यापाऱ्याला गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. दोघांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर व्यापाऱ्याने बोरिवली पोलिसात तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखा कक्ष -१२ कडे वर्ग करण्यात आला. तपास करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. 

टॅग्स :ExtortionखंडणीPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई