शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

राज ठाकरेंच्या नावे खंडणीची मागणी; चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:15 IST

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मढ परिसरातील एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली तसेच सुरक्षा रक्षकाकडे पैशांचीही मागणी केली होती.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चालकाला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. तर एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस पाठवली आहे.मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मढ परिसरातील एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली तसेच सुरक्षा रक्षकाकडे पैशांचीही मागणी केली होती. पुढे आरोपींनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्यानंतर संबंधित घटनेचा व्हिडिओही व्हायरल केला होता. १५ तारखेला  सुरक्षा रक्षकाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार,पोलिसांनी मारहाण, खंडणी प्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. तपास सुरू करत दिग्दर्शक मीलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलंकर यांना अटक केली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला नोटीस बजावली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ती असल्याचीही माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये काय आहे?व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करताना ती त्याला राजसाहेबांना ओळखत नाहीस का? तू मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही? काम कोणासाठी करतोस? असे अनेक प्रश्नही विचारताना दिसत आहे. महिलेला नोटीस पण... गैरहजरयाप्रकरणातील महिलेला चौकशीसठी  नोटीस पाठवून हजर राहण्यास सांगण्यात आले होते; मात्र ती हजर राहिली नाही. याप्रकरणी महिलेला पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे