शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

 नागपुरात एमडीची तस्करी करताना सापडला तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 10:47 PM

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कुख्यात राहुल ऊर्फ चिल लेपसेला तडीपारसह दोन साथीदारांसह अटक करून एमडी तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

ठळक मुद्देकुख्यात चिलसह तिघांना अटक : विद्यार्थ्यांना केले होते ग्राहक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कुख्यात राहुल ऊर्फ चिल लेपसेला तडीपारसह दोन साथीदारांसह अटक करून एमडी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून ८७ हजाराची एमडी तसेच मोबाईल जप्त केले आहेत.आरोपींची चौकशी केल्यास त्यांच्याकडून एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटची माहिती मिळू शकते. चिल लेपसेचा तडीपार साथीदार मृणाल मयुर गजभिये (२४) आनंदनगर, सीताबर्डी तसेच जिया खान ताज खान (२३) रा. भालदारपुरा, गंजीपेठ आहे. राहुल ऊर्फ चिल लेपसे बऱ्याच काळापासून एमडी तस्करी करतो. त्याला एकदा पकडण्यात आले होते. परंतु काही काळापासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. एनडीपीए सेलला मंगळवारी रात्री लेपसेचा साथीदार तडीपार मृणाल गजभिये ट्रॅव्हलने नागपुरात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अमरावती मार्गावर सापळा रचला. त्यांनी अमरावती मार्गावर मेहता कॉम्प्लेक्सजवळ मृणालला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५७ हजार रुपये किमतची १९ ग्रॅम एमडी तसेच मोबाईल मिळाला. पोलिसांनी मृणालला अटक करून चौकशी केली. त्याने लेपसे आणि जिया जवळ मोठ्या प्रमाणात एमडी असल्याचे सांगितले. त्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक करून ३० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम एमडी तसेच मोबाईल जप्त केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेपसेच्या इशाऱ्यावर मृणाल आणि जिया खान एमडीची विक्री करतात. लेपसे मुंबईच्या एका मोठ्या तस्कराकडून एमडी खरेदी करतो. आधी एमडी रेल्वेने नागपुरात आणण्यात येत असे. यामुळे पोलिसांनी रेल्वेने येणाऱ्या संशयितांवर नजर ठेवणे सुरू केले होते. पोलिसांनी अनेकदा त्यांना रेल्वेस्थानकावरून जाताना पकडले होते. यामुळे एमडी तस्कर आता ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थSmugglingतस्करीArrestअटक