शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आयपीएलवर चालत्या कारमध्ये सुरु असलेल्या बेटिंगचा पर्दाफाश; पिंपरीत दोघांना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 19:58 IST

चालत्या कारमध्ये ते दोघे आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याचे समोर आले..

ठळक मुद्दे झीरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत पिंपरी पोलिसांची कारवाई

पिंपरी : देशभरात आयपीएलमुळे क्रिकेट फिवर आहे. याचा गैरफायदा घेत क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. चालत्या कारमध्ये ते दोघे आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याचे समोर आले. पिंपरीगाव येथील वैभवननगर येथे शुक्रवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास छापा टाकून पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली. 

लालचंद देवीदास शर्मा (वय ४९), चेतन जयरामदास कोटवाणी (वय ५०, दोघे रा. पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याकत आला असून त्यांच्याकडून २४ लाख २७ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तकेला आहे.

पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार झीरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी पिंपरी पोलीस ठाण्याकडून कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. वैभवनगर, येथे अवैधरित्या दोन व्यक्ती आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून चार मोबाइल, एक नोटबुक, दोन पेन, कॅलक्यूलेटर, एक चारचाकी वाहन व पाच हजार ८५० रुपयांची रोकड, असा २४ लाख २७ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.  पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्रनिकाळजे, उपनिरीक्षक  सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीIPL 2020IPL 2020ArrestअटकPoliceपोलिस