शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:29 IST

तिघांना अटक; प्रॅन्क व्हिडिओच्या नावाखाली तरुणी, बालकांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रॅन्क व्हिडिओ बनविण्याच्या नावाखाली तरुणी, बालकांचे अश्लील व्हिडिओ बनवून यू-ट्यूबवर प्रसारित करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलीस दलाच्या सायबर गुन्हा अन्वेषण शाखेने शनिवारी पर्दाफाश केला. तिघांना अटक केली. मुकेश फुलपद गुप्ता (वय २९, रा.ठाणे), प्रिन्स कुमार राजू साव (२३) व जितेंद्र बैचतराम गुप्ता (२५ दोघे रा.कुरार व्हिलेज), अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ लॅपटॉप, ४ मोबाइल व १ कॅमेरा जप्त केला आहे. त्याच्या साहाय्याने ३०० हून अधिक अश्लील व्हिडिओ बनविल्याचे उघड झाल्याचे गुन्हा अन्वेषण शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. 

त्यांनी मरीन लाइन्स, अक्सा, गोराई, कांदिवली, जुहू बीच, बालाजी गार्डन आदी भागांत तरुणी व लहान मुलांचे व्हिडिओ बनवून लाखो रुपयांची कमाई केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यू ट्यूबवर सार्वजनिक ठिकाणी अयोग्य पद्धतीने महिलांचे अश्लील, लैंगिक चाळ्यांचे व्हिडिओ बनवून त्याला तसे नाव देऊन डाऊनलोड केले जातात, अशी माहिती राज्य महिला आयोगाला मिळाली होती. त्यांनी बीकेसीतील सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. 

त्याबाबत सह आयुक्त भारंबे, अपर आयुक्त विरेश प्रभू, सायबर विभागाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक एस.एस. सहस्त्रबुद्धे, मौसमी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून या टोळीचा छडा लावला. तिघे आरोपी संगणकाचा वापर करण्यात माहीर असून, त्यांनी अनेक यू ट्यूब चॅनल बनविले होते. त्यावर अश्लील व्हिडिओ पाठवीत होते.

टॅग्स :Policeपोलिस