धडाकेबाज कारवाई; पोलिसी खाक्या दाखवून दुचाकी चोरट्यांची टोळी केली जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:32 PM2021-02-10T14:32:43+5:302021-02-10T14:34:21+5:30

Gang Arrested : ५ अटक करून ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Explosive action; Police arrested two gangs of bike thieves | धडाकेबाज कारवाई; पोलिसी खाक्या दाखवून दुचाकी चोरट्यांची टोळी केली जेरबंद 

धडाकेबाज कारवाई; पोलिसी खाक्या दाखवून दुचाकी चोरट्यांची टोळी केली जेरबंद 

Next
ठळक मुद्देपोलीसी खाक्या दाखविताच खेड तालुक्यातील राक्षेवाडी पाबळ रोड येथे एक ज्युपीटर मोटारसाइकल, तसेच घारगाव, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, निघोज, पारनेर, अकोले येथून १५ मोटारसायकळ चोरुन आणल्याची कबुली दिली.

राजगुरुनगर - खेड पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १६ चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. ५ अटक करून ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील आठवडयात खेड पोलिस ठाण्याचे कर्मचारी दुपारी गस्त घालत असताना राजगुरुनगर येथील पाबळ रोड येथे दोन व्यक्ती वेगवेगळ्या कंपनीच्या दोन मोटारसायकलवर संशयीतरित्या आढळून आले. त्या व्यक्तीना थांबवून पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नवनाथ विजय पवार ( वय २१ ) (रा. माळवाडी साकुर, ता संगमनेर ), सुनिल रामनाथ जाधव (रा. माणुसवाडी,रणंखाब ,संगमनेर ) असे नावे सांगुन या दोन्ही गाडया दि २७ जानेवारी रोजी चोरी केल्या आहेत, अशी कबुली दिली. पोलिसांनी खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी पथक तयार करून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी संगमनेर तालुक्यात सापळा लावला. अजित रावसाहेब केदार (रा.रणखांब उपळी, ता. संगमनेर ) रमेश अंबादास दुधवडे (रा. खैरेदरा, नांदुर ता. संगमनेर ), शिवाजी पोपट कातोरे (रा .जांबुत ता. संगमनेर ) यांना ताब्यात घेतले. 

पुणे कोर्टाने गुंड गजा मारणेसह त्याच्या २२ साथीदारांची केली निर्दोष मुक्तता  

 

Breaking : अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

पोलीसी खाक्या दाखविताच खेड तालुक्यातील राक्षेवाडी पाबळ रोड येथे एक ज्युपीटर मोटारसाइकल, तसेच घारगाव, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, निघोज, पारनेर, अकोले येथून १५ मोटारसायकळ चोरुन आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमारे ४ लाखांच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. पोलिस विभागीय आधिकारी अनिल लबांते, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव, पोलिस निरिक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन जतकर, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, सुधीर शितोळे, संतोष मोरे, विशाल कोठावळे संतोष शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे करित आहे.

Web Title: Explosive action; Police arrested two gangs of bike thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.