कल्याणमधील श्रीकृष्णनगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 03:43 PM2021-01-03T15:43:11+5:302021-01-03T15:45:16+5:30

Cylinder Blast : या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

Explosion of a domestic gas cylinder at Shrikrishnanagar in Kalyan | कल्याणमधील श्रीकृष्णनगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

कल्याणमधील श्रीकृष्णनगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

googlenewsNext
ठळक मुद्दे हा परिसर टेकडीचा असल्याने अग्नीशमन दलाला आग विझविण्यासाठी कसरत करावी लागली.

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरातील श्रीकृष्णनगरातील टेकडीवर एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली. या घटनेत जीवित हानी झालेली नसली तरी घर जळून खाक झाले आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाने धाव घेऊन लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहचल्या होत्या. हा परिसर टेकडीचा असल्याने अग्नीशमन दलाला आग विझविण्यासाठी कसरत करावी लागली. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

 

Web Title: Explosion of a domestic gas cylinder at Shrikrishnanagar in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.