शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीला आर्थिक चणचण जाणवू न देण्यासाठी बॉलिवूडमधील लेखकाने केला सायबर फ्रॉड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 21:49 IST

Cyber Fraud : आपल्या युट्युबर प्रेयसीला आर्थिक छानछान भासू न देता  खूश ठेवण्याच्या नादात लेखक प्रियकराला आता सायबर फ्रॉड केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शुभम शाहू हा बॉलीवूडमधील छोटा-मोठा स्टोरी रायटर आहे

ठळक मुद्देहा आरोपी बॉलिवूडमधील पटकथा लेखक आहे. शुभम पीतांबर साहू असं या २८ वर्षीय लेखकाचं नाव आहे.

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बॉलीवूडमधील एका लेखकाने आपल्या गर्लफ्रेंडला खूश ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. या प्रियकराने अनेकांना लाखो रुपयांचा चूना देखील लावला आहे. हा आरोपी बॉलिवूडमधील पटकथा लेखक आहे. शुभम पीतांबर साहू असं या २८ वर्षीय लेखकाचं नाव आहे.आपल्या युट्युबर प्रेयसीला आर्थिक छानछान भासू न देता  खूश ठेवण्याच्या नादात लेखक प्रियकराला आता सायबर फ्रॉड केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शुभम शाहू हा बॉलीवूडमधील छोटा-मोठा स्टोरी रायटर आहे. सध्या तो ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात आहे. स्टोरी रायटींगमधून त्याची चांगली कमाई होत होती. परंतु कोरोनामुळे अचानक मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि शुभम आर्थिक पेचात सापडला.

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहू हा एका मुलीच्या प्रेमात होता. ही मुलगी एक युट्य़ूबर आहे. आपण सामोरं जात असणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत प्रेयसीला माहिती मिळू नये यासाठीच त्यानं लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. याच फसवणुकीतून आलेल्या पैशांतून त्यानं प्रेयसीला सोन्याची बांगडी भेट दिली. इतक्यावरच न थांबता त्याने प्रेयसीला जयपूरला सहलीसाठी नेण्याचीही व्यवस्था केली.

लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याने एक नवा मार्ग अवलंबत मुंबईतील लोखंडवाला भागातील एका टूर्स एँड ट्रॅव्हल कंपनीशी संपर्क करुन त्य़ानं ऑनलाईन फ्लाईट आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक केला. या साऱ्याचं बिल 32 हजार रुपये इतकं झालं. अनलॉकनंतर सगळे व्यवहार खुले झाल्याने शुभमनं आपल्या प्रेयसीला बाहेर फिरायला घेवून जाण्यासाठी मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत विमानाची तिकिट त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग केलं. प्रेयसीला महागडे गिफ्ट देण्याकरता पैसे मिळवण्यासाठी शुभनने बल्क मॅसेजचा वापर केला. यासाठी त्याने इंटरनेटवर त्या ट्रॅव्हल कंपनीमधून या आधी बुकिंग केलं आणि त्याचे पैसे ॲानलाईन ट्रान्सफर केल्यानंतर येणाऱ्या मॅसेजचा फोटो काढून इंटरनेटवर अपलोड केला होता. तोच मॅसेज पाहून तसाच मॅसेज बनवून त्याने ट्रॅव्हल कंपनीला पैसे पाठवल्याचे भासवले. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमArrestअटकAndheriअंधेरीMumbaiमुंबईPoliceपोलिसbollywoodबॉलिवूड