शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

पोलीस ठाण्यातून दोन आरोपींचा पोबारा; मळमळ होत असल्याचे केले नाटक!

By संजय तिपाले | Updated: August 28, 2022 12:52 IST

गुटखा प्रकरणात विशेष पथकाने घेतले होते ताब्यात: पेठ बीड ठाण्यातील प्रकार

बीड : चार लाखांचा गुटखा घेऊन निघालेली जीप पकडून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन आरोपींसह मुद्देमाल पेठ बीड पोलिसांच्या स्वाधीन केला. मळमळत होत असल्याचा बहाणा करुन त्या दोघांनी पोबारा केला. २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता हा प्रकार घडला.

शेख मोहसीन शेख सलाउद्दीन  (२८,रा.खाजानगर, मोमीनपुरा, बीड) व शेख इकबाल शेख रशीद  (रा.मिल्लतनगर, मोमीनपुरा, बीड)अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे हे २७ रोजी शहरात गस्त घालत होते. बार्शी रोडने मालवाहू जीपमधून (एमएच २० सीटी-३५१७) गुटखा मोमीनपुरा येथे जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशाने त्यांनी बार्शी नाका येथे सापळा रचला. 

यावेळी जीप थांबविताच चालकाने उडी मारुन पोबारा केला. पथकाने शेख मोहसीन शेख सलाउद्दीन व शेख इकबाल शेख रशीद यांना पकडले. या दोघांसह शेख राजू शेख इलियास व शेख सोनू शेख बादल (दोघे रा.महंमदिया कॉलनी, बीड) यांच्यावर सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या फिर्यादीवरुन पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

जीप पकडून झडती घेतली तेव्हा त्यात ८ लाख ८२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळला,  चार लाखांच्या जीपसह १२ लाख ८२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल सायंकाळी सहा वाजता पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान, ठाणे अंमलदार संजयकुमार राठोड यांनी दोन्ही आरोपींना बाकड्यावर बसवले. 

दोघांसाठी दुचाकी होती तयारसायंकाळी साडेसहा वाजता शेख इकबाल याने उलट्या - मळमळ होत असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाणे अंमलदार संजयकुमार राठाेड यांनी त्यास बाहेर आणले. यावेळी हिसका देऊन तो पळाला. यावेळी शेख  मोहसीननेही धूम ठोकली. दोघांनी एकामागोमाग एक पलायन केले.   राठोड यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण एका  व्यक्तीच्या दुचाकीवरुन ते पळून गेले. संजयकुमार राठोड यांच्या फिर्यादीवरुन पळून गेलेल्या दोन आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्रूा अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा नोंदविण्यात आला. 

दोन आरोपींनी पलायन केल्यानंतर रात्रभर त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचा स्वतंत्र गुन्हा नोंद केला आहे. त्यांचा शोध सुरु आहे. लवकरच अटक केली जाईल.- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी