कर्मचाऱ्यानेच सराफाच्या दुकानावर मारला डल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 21:00 IST2019-01-23T20:58:36+5:302019-01-23T21:00:29+5:30

९ जानावोरी रोजी दुकानात घरफोडी करुन चोरट्यांनी दुकानातील साडे दहा लाख रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने चोरुन नेले अशी माहिती कर्मचारी संजय दशरथ वाकशे यांनी चोपडा यांना दिली.

Employee killed the bullion shop | कर्मचाऱ्यानेच सराफाच्या दुकानावर मारला डल्ला 

कर्मचाऱ्यानेच सराफाच्या दुकानावर मारला डल्ला 

ठळक मुद्देअरविंद चोपडा रा. बाबु मेस्त्री चाळ, भाईंदर पश्चिम यांचे पुर्वेच्या महात्मा फुले छेद मार्गावरील जैसल कॉम्पलेक्स मध्ये यासीका नावाने सराफा दुकान आहे. नवघर पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरु केला होता. दुकानात असलेल्या गोपनिय सीसीटीव्हीमध्ये चोरी करताना दिसुन आला

मीरारोड - बनावट चावीने सराफा दुकान उघडून आतील साडे लाख रुपयांचे दागीने चोरुन वर चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्यास पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

अरविंद चोपडा रा. बाबु मेस्त्री चाळ, भाईंदर पश्चिम यांचे पुर्वेच्या महात्मा फुले छेद मार्गावरील जैसल कॉम्पलेक्स मध्ये यासीका नावाने सराफा दुकान आहे. १९ जानावोरी रोजी दुकानात घरफोडी करुन चोरट्यांनी दुकानातील साडे दहा लाख रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने चोरुन नेले अशी माहिती कर्मचारी संजय दशरथ वाकशे यांनी चोपडा यांना दिली.

नवघर पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरु केला होता. दुकानात असलेल्या गोपनिय सीसीटीव्हीमध्ये चोरी करताना दिसुन आला. पोलीसांनी त्याला अटक करुन कसुन चौकशी केली असता आपल्या कडील चावीने दुकान उघडुन चोरी केल्याचे व दागीने घरात लपवुन ठेवल्याचे सांगीतल्यावर पोलीसांनी दागीने जप्त केले.

Web Title: Employee killed the bullion shop