सापळ्यात अडकला कर्मचारी, अडीच हजाराची लाच घेणारा रंगेहात पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 09:51 PM2021-10-20T21:51:04+5:302021-10-20T21:51:36+5:30

एसीबीची कारवाई : वीजाेडणीसाठी मागितली लाच

Employee caught in a trap, a bribe taker of two and a half thousand in latur | सापळ्यात अडकला कर्मचारी, अडीच हजाराची लाच घेणारा रंगेहात पकडला

सापळ्यात अडकला कर्मचारी, अडीच हजाराची लाच घेणारा रंगेहात पकडला

Next
ठळक मुद्देया तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी हाळी हंडरगुळी येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून २ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना रहीम पापामियाॅ शेख याला पथकाने रंगेहात केले.

लातूर : वीजजाेडणीच्या कामासाठी २ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लातूर येथील पथकाने बुधवारी दुपारी रंगेहात पकडले. याबाबत वाढवणा (बु.) पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुल्यातील हाळी हंडरगुळी येथील वीजमंडळात टेक्निशियन या पदावर रहीम पापामियाॅ शेख (४७) हा कार्यरत आहेत. दरम्यान, तक्रारदाराने वीजमीटरसाठी ऑनलाईन अर्ज केलेला हाेता. दरम्यान, केलेल्या ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने वीज जाेडणीसाठी सर्व कागदपत्र उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन, त्यामध्ये कसलीही त्रुटी न काढता मदत करताे, असे तक्रारदाला सांगितले. वीजजाेडणी देण्याच्या कामासाठी २ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी हाळी हंडरगुळी येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून २ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना रहीम पापामियाॅ शेख याला पथकाने रंगेहात केले.

याबाबत वाढवणा (बु.) पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, सहायक पाेलीस निरीक्षक नाैशाद पठाण यांनी दिली.

Web Title: Employee caught in a trap, a bribe taker of two and a half thousand in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app