शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषद : फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत राव १४९ दिवस रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 21:35 IST

Elgar parishad : राव यांच्या वकिलांची उच्च न्यायालयाला माहिती

ठळक मुद्दे न्यायालयाने  या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला.राव यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांची सतत देखभाल करणे आवश्यक आहे आणि तळोजा कारागृह ते करण्यास असमर्थ आहे.

मुंबई : फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत राव ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस रुग्णालयातच होते. यावरून त्यांची  प्रकृती ठीक नसल्याचे समजते, अशी माहिती एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत वरवरा राव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. दरम्यान न्यायालयाने  या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला.

 

राव यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची जामिनावर सुटका करावी व त्यांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत हैद्राबाद येथे राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जयसिंग यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाला दिली.  आयुष्य सर्वांनाच प्रिय आहे. कैद्यांनाही ते प्रियच आहे आणि न्यायालय त्याचे संरक्षण करण्यासाठी आहे. वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी राव १४९ दिवस रुग्णालयातच होते. त्यांची प्रकृती चांगली नसल्याचे निदर्शनास आणण्यासाठी हे रेकॉर्ड पुरेसे बोलके आहे, असा युक्तिवाद राव यांच्या वकिलांनी केला.

पाेलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न   

राव यांनी प्रकृतिच्या कारणास्तव न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. तर राव यांच्या मूलभूत अधिकारांची कारागृह प्रशासनाकडून पायमल्ली होत असल्याने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका राव यांच्या पत्नीने न्यायालयात केली आहे.  राव यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांची सतत देखभाल करणे आवश्यक आहे आणि तळोजा कारागृह ते करण्यास असमर्थ आहे. राव यांनी कोणाची हत्या केली नसल्याने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होणार नाही. केवळ सहआरोपीच्या संगणकात काही गोष्टी आढळल्याने राव यांना अटक करण्यात आली. राव यांची काळजी त्यांच्या कुटुंबियांना घेऊ द्या. जेणेकरून ते खटल्यास उभे राहतील, असा युक्तिवाद जयसिंग यांनी केला.

कौटुंबिक कलहातून सासर्‍याची हत्या; आरोपी जावयाला अटक

खटला जलदगतीने सुरू करणे, हा ही आरोपीचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणात आरोपींवर अद्याप आरोप निश्चित करण्यात आले नाहीत. २०० साक्षीदारांचे जबाब नोंदविले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.  एका आरोपीचा वैद्यकीय जामीन मंजूर करण्यासाठी साक्षीदारांना परदेशातून बोलावू शकत नाही, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला. 

 

 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाHigh Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटलjailतुरुंग