विजेचा शॉक देऊन २ वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला १६ वर्षांनी अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:32 IST2025-02-04T13:31:58+5:302025-02-04T13:32:06+5:30

संजय असे या आरोपीचे नाव असून त्याने २००९ मध्ये २ वर्षांच्या मुलाची विजेचा शॉक देऊन हत्या केली होती. 

electrocuted and killed two year old absconding for 16 years man arrested in noida | विजेचा शॉक देऊन २ वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला १६ वर्षांनी अटक!

विजेचा शॉक देऊन २ वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला १६ वर्षांनी अटक!

नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांनी १६ वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. संजय असे या आरोपीचे नाव असून त्याने २००९ मध्ये २ वर्षांच्या मुलाची विजेचा शॉक देऊन हत्या केली होती. 

आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी असून या घटनेनंतर तो नेपाळला पळून गेला होता. आता त्याला नोएडामधील सेक्टर ६२ मधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २००९ मध्ये आरोपीने एका घरात घुसून एका निष्पाप मुलाला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली होती. याबाबत मृत मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी मृताच्या घरी इलेक्ट्रिशियन म्हणून जात असे आणि नोएडाच्या सेक्टर 58 मधील मामुरा येथे काम करत असे. हत्येच्या दिवशी मुलाचे आई-वडील घरी नसताना आरोपी घरात घुसला आणि त्याने मुलाची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी संजय नेपाळला पळून गेला आणि तेव्हापासून तो फरार होता. नोएडा पोलीस त्याचा सतत शोध घेत होते आणि अखेर त्याला नोएडामधील सेक्टर ६२ मधून अटक करण्यात आली.
 
डीसीपी सुमित कुमार शुक्ला म्हणाले की, आरोपीला अटक केल्यानंतर आता पोलीस मृताच्या कुटुंबाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. ही अटक पोलिसांसाठी एक मोठे यश मानले जात आहे, कारण आरोपी इतक्या वर्षांपासून फरार होता. दरम्यान, या प्रकरणी नोएडा पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.

Web Title: electrocuted and killed two year old absconding for 16 years man arrested in noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.