ECI Website Hacking: निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक, तीन महिन्यात बनवली 10,000 मतदान ओळखपत्रे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 02:52 PM2021-08-13T14:52:01+5:302021-08-13T14:52:57+5:30

ECI Website Hacking : सहारनपूरचे एसएसपी एस चेनप्पा म्हणाले की, आरोपी विपुल सैनीने नकुड भागातील त्याच्या कम्प्युटरच्या दुकानातून हॅकिंग केले.

election commission website hacking case accused arrested from saharanpur | ECI Website Hacking: निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक, तीन महिन्यात बनवली 10,000 मतदान ओळखपत्रे 

ECI Website Hacking: निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक, तीन महिन्यात बनवली 10,000 मतदान ओळखपत्रे 

Next

सहारनपूर : निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइट हॅक प्रकरणी आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. अटकपूर्वी आरोपीने १०,००० हून अधिक बनावट मतदार ओळखपत्रे तयार केली होती. उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सहारनपूरचे एसएसपी एस चेनप्पा म्हणाले की, आरोपी विपुल सैनीने नकुड भागातील त्याच्या कम्प्युटरच्या दुकानातून हॅकिंग केले.

आयोगाच्या अधिकाऱ्यांचा पासवर्ड केला हॅक
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी विपुल सैनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वापरलेल्या पासवर्डद्वारे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर लॉग इन करत असे. याबाबत आयोगाला संशय आला आणि तपास यंत्रणांना माहिती दिली. यंत्रणांच्या तपासादरम्यान सैनी  संशयाच्या भोवऱ्यात आला आणि त्यांनी सहारनपूर पोलिसांना सैनीबद्दल माहिती दिली.

3 महिन्यांत 10,000 हून अधिक मतदार ओळखपत्रे केली तयार
एसएसपी चेनप्पा म्हणाले, "चौकशीदरम्यान सैनीने सांगितले की, तो मध्य प्रदेशातील हरदा येथील रहिवासी अरमान मलिक यांच्या सांगण्यावरून काम करत होता आणि त्याने तीन महिन्यांत १०,००० हून अधिक मतदार ओळखपत्रे बनवली होती. सायबर सेल आणि सहारनपूर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी सैनीला अटक केली.'

बँक खात्यात आढळले ६० लाख रुपये
सहारनपूर एसएसपी म्हणाले की, तपासात सैनीच्या बँक खात्यात ६० लाख रुपये आढळले असून यानंतर खात्यातून होणारे व्यवहार त्वरित थांबविण्यात आले आहेत. सैनी याच्या खात्यात ही रक्कम कोठून आली याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.

आरोपीने सहारनपूर येथून केले होते बीसीए 
चौकशीत सैनीने सांगितले की, ओळखपत्राच्या बदल्यात त्याला १०० ते २०० रुपये मिळतात. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन कम्प्यूटरही जप्त केले आहेत. तपास एजन्सी त्याला न्यायालयात हजर करेल आणि त्याच्या न्यायालयीन कोठडीसाठी अपील करेल. एसएसपी म्हणाले की, सैनीचे वडील शेतकरी आहेत. सैनीने सहारनपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयातून बीसीए केले आहे.

Web Title: election commission website hacking case accused arrested from saharanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.