शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चाेरण्यासाठी वृद्ध महिलेची हत्या, आरोपी १२ तासांत गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 13:15 IST

वागळे इस्टेट, किसननगर नं. २, संजय गांधी नगर, शिवदेवी मंदिराच्या बाजूला, पाईपलाईनजवळ मृत जिजाबाई केदार (६५) आणि मारेकरी नारायण आणि त्याची आई सुभावती केवट हे शेजारीच राहतात.

ठाणे : वयोवृद्ध जिजाबाई केदार या महिलेची गळा चिरून हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नारायण विजयलाल केवट (२७) याच्यासह त्याला मदत करणारी त्याची आई सुभावती (४७) हिला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. अवघ्या १२ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. चोरीच्या उद्देशाने हत्या केलेल्या मायलेकांना येत्या १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.  वागळे इस्टेट, किसननगर नं. २, संजय गांधी नगर, शिवदेवी मंदिराच्या बाजूला, पाईपलाईनजवळ मृत जिजाबाई केदार (६५) आणि मारेकरी नारायण आणि त्याची आई सुभावती केवट हे शेजारीच राहतात. ५ सप्टेंबरपासून जिजाबाई हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृत जिजाबाईच्या  घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यावर पोलिसांनी घराचे कुलूप तोडले. घरामध्ये जिजाबाईचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या पथकाने  कोणताही सुगावा नसताना मोठ्या कौशल्याने व चिकाटीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणत मारेकऱ्याला अटक केली. या गुन्ह्याची माहिती असतानाही ती लपविण्यासाठी मदत करणारी मारेकऱ्याची आई सुभावती हिचा देखील गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यावर तिला अटक केली. 

जिजाबाई परिसरात चालवायची भिशीजिजाबाई त्या परिसरात भिशी चालवत होती व सावकारीचे काम करीत असे, तिचा नवरा १५ वर्षांपासून बेपत्ता असल्याने ती एकटीच राहत होती. मारेकरी नारायण हा नशेबाज असून तो कोणताही कामधंदा करीत नसल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसThiefचोरDeathमृत्यू