शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाला वैतागून मुलाने वयोवृद्ध आईची गळा दाबून केली हत्या; पुरावे लपवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 21:21 IST

Mother was strangled to death : ही घटना राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरपुरा येथे शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.

ठळक मुद्दे७५ वर्षीय मृत महिलेचं नाव शरबती देवी असून त्यांना तीन मुलं आहेत. त्या सध्या आपल्या मधल्या म्हणजेच  दुसऱ्या नंबरचा मुलगा अशोक कुमारसोबत गावीच राहत होत्या.

राजस्थानमधील झुंझुनूं  येथे आई आणि पत्नीच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या जन्मदात्या ७५ वर्षीय आईची गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे आरोपी मुलाने पुरावे नष्ट करण्यासाठी आईच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तिला जाळूनही टाकलं. मात्र, त्याने केलेला गुन्हा लपवू शकला नाही. केवळ २४ तासांत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

ही घटना राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरपुरा येथे शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याबाबतची माहिती आरोपी मुलगा अशोक कुमार याने स्वतः पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या हत्येप्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासून मुलगा अशोक कुमारवर संशय होता. यानंतर पोलिसांनी अशोक कुमार याला ताब्यात घेतलं. तेव्हा सुरुवातीला अशोकने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, शेवटी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 ७५ वर्षीय मृत महिलेचं नाव शरबती देवी असून त्यांना तीन मुलं आहेत. त्या सध्या आपल्या मधल्या म्हणजेच  दुसऱ्या नंबरचा मुलगा अशोक कुमारसोबत गावीच राहत होत्या. मात्र, अशोक कुमारची पत्नी आणि त्यांच्यात नेहमी खटके उडत. किरकोळ कारणावरून दररोज होणाऱ्या वादातून आरोपी मुलाने आपल्या आईची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासात हत्येचा छडा लावून आरोपी मुलाला अटक केली आहे, अशी माहिती  दैनिक भास्करने दिली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसाArrestअटक