Elderly mother-in-law screaming for help, daughter in law beat her | 'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती 

'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती 

ठळक मुद्देया व्हीडिओमध्ये एक महिला बाजेवर बसलेल्या म्हाताऱ्या महिलेला झाडूनं मारताना दिसते आहे. हा व्हिडीओ बाह भागातल्या भाऊपुरा गावातील आहे. 

सासू सून म्हटलं की खटके उडण्याचं नातं असं म्हटलं जाते. मात्र, सासूने छळ न करता सुनेनेच सासूला अमानुषपणे मारहाण केल्याचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील ही डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे. एका वयोवृद्ध सासूला तिच्या सुनेनं निर्दयपणे मारहाण केली आहे. 

या व्हीडिओमध्ये एक महिला बाजेवर बसलेल्या म्हाताऱ्या महिलेला झाडूनं मारताना दिसते आहे. हा व्हिडीओ बाह भागातल्या भाऊपुरा गावातील आहे. या म्हातारी सासू मदतीसाठी ओरडत आहे. सासूला बेदमपणे मारणारी महिला तिची सून आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही निर्दयी सून नेहमीच आपल्या सासूला अशी मारहाण करते, अशी चर्चा आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी सुनेवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. 

बाह भागातील भाऊपुरा गावात सुनेने आपल्या सासूला क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हीडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात ८५ वर्षांची वृद्धा घरातील बाजेवर झोपलेली दिसते. तिच्या पायाला पट्टी बांधलेली दिसते. अचानक तिची सून येते आणि सासूला झाडूने मारू लागते. वृद्ध महिला आजूबाजूच्यांना मदतीसाठो हाका मारत राहते. ती ओरडत असूनही सुनेला दया आली सतत मारतच राहिली, शेवटी तिने मोठा लाकडाचा दांडका घेऊन तिच्यावर उगारला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर बाह येथील पोलीस निरीक्षक विनोद कुमार पवार यांनी अशी माहिती दिली आहे की,  त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती मिळताच या गावात पोलिसांना पाठवलं. सून घरी नव्हती. त्या वृद्धेची अवस्था मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या नाजूक आहे. अनेकदा ही वृद्धा न सांगता घरातून निघून जाते. या कारणानं सुनेने तिला बेदम मारल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Elderly mother-in-law screaming for help, daughter in law beat her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.