किरकोळ कारणावरून धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:38 IST2019-01-02T18:35:55+5:302019-01-02T18:38:58+5:30

अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडला. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

The elder brother murdered on minor basis due to minor reasons | किरकोळ कारणावरून धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

किरकोळ कारणावरून धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

ठळक मुद्दे दोन सख्या भावांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होतेहे दोघे एकत्रितपणो घरात जात असतानाचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरणही झालेघरात घुसून स्क्रू ड्राइव्हरच्या सहाय्याने मानेवर आणि गळयावर वार केले

अंबरनाथ - किरकोळ कारणावरून धाकड्या भावाने थोरल्या भावाची हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडला. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात रहाणारे गणेश सुब्बरायन (38) आणि वीरेन सुब्बराय (25) या दोन सख्या भावांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याचा राग मनात धरून 1 जानेवारीला रात्री अकराच्या सुमारास दारू पिऊन आलेल्या वीरेनने मोठा भाऊ गणेश सुब्बारायनला घरात दारू पाजून आणले. हे दोघे एकत्रितपणो घरात जात असतानाचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरणही झाले आहे. घरात घुसून स्क्रू ड्राइव्हरच्या सहाय्याने मानेवर आणि गळयावर वार केले. यात अति रक्तस्त्राव झाल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला. हा वाद सुरू असताना परिसरातील महिला घराबाहेर थांबलेले होत्या. मात्र, घराच्या आत काय घडले याची कल्पना कोणालाच आली नाही. हत्या केल्यावर विरेन घराबाहेर आल्यावर स्थानिकांनी घरात प्रवेश केला.यावेळी गणेश हा गंभीर जखमी अवस्थेत दिसला. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. या प्रकारानंतर हत्या करणारा विरेन हा देखील शांतपणे घराबाहेर निघुन गेला. विरेन निघुन गेल्यावर स्थानिकांनी गणेशला रुग्णालयात हलविले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. हत्येतील आरोपी विरेन याला लागलीच पोलीसांनी अटक केली आहे.

Web Title: The elder brother murdered on minor basis due to minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.