शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याच्या वादातून थोरल्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 19:47 IST

आरोपीला अटक : पालगाव बोटोनी येथील घटना

ठळक मुद्देही थरारक घटना मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पालगाव बोटोणी येथे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.अशोक सीताराम आत्राम (४३) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोकचा मोठा भाऊ वसंता सीताराम आत्राम (४९) याला अटक केली आहे.

मारेगाव(यवतमाळ) -  गोठ्याच्या जागेवरून दोन सख्या भावात वाद झाला. या वादात मोठया भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याला थेट यमसदनीच धाडले. ही थरारक घटना मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पालगाव बोटोणी येथे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अशोक सीताराम आत्राम (४३) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोकचा मोठा भाऊ वसंता सीताराम आत्राम (४९) याला अटक केली आहे. पालगाव बोटोणी येथील अशोक आत्राम व वसंता आत्राम या दोन सख्ख्या भावांमध्ये गोठ्याच्या जागेवरून नेहमीच वाद व्हायचा.  सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास या दोन भावंडात गोठ्याच्या जागेवर कंपाऊंड करण्याच्या मुद्यावरून चांगलाच वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, वसंताने संतापाच्या भरात लहान भाऊ अशोकवर कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात अशोक जागीच ठार झाला. घटनेच्या वेळी मृत अशोक आत्रामची पत्नी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. घटनेची माहिती मिळताच, ती लगबगीने घरी पोहचली, तेव्हा अशोक रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. यासंदर्भात मृताची पत्नी पुष्पा आत्राम हिने मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी वसंता आत्राम याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार

 

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

 

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकYavatmalयवतमाळ