गोठ्याच्या वादातून थोरल्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 19:47 IST2020-06-01T19:44:27+5:302020-06-01T19:47:24+5:30

आरोपीला अटक : पालगाव बोटोनी येथील घटना

The elder brother killed the younger brother in a barn dispute pda | गोठ्याच्या वादातून थोरल्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

गोठ्याच्या वादातून थोरल्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

ठळक मुद्देही थरारक घटना मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पालगाव बोटोणी येथे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.अशोक सीताराम आत्राम (४३) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोकचा मोठा भाऊ वसंता सीताराम आत्राम (४९) याला अटक केली आहे.

मारेगाव(यवतमाळ) -  गोठ्याच्या जागेवरून दोन सख्या भावात वाद झाला. या वादात मोठया भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याला थेट यमसदनीच धाडले. ही थरारक घटना मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पालगाव बोटोणी येथे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.


अशोक सीताराम आत्राम (४३) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोकचा मोठा भाऊ वसंता सीताराम आत्राम (४९) याला अटक केली आहे. पालगाव बोटोणी येथील अशोक आत्राम व वसंता आत्राम या दोन सख्ख्या भावांमध्ये गोठ्याच्या जागेवरून नेहमीच वाद व्हायचा.  सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास या दोन भावंडात गोठ्याच्या जागेवर कंपाऊंड करण्याच्या मुद्यावरून चांगलाच वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, वसंताने संतापाच्या भरात लहान भाऊ अशोकवर कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात अशोक जागीच ठार झाला.

 घटनेच्या वेळी मृत अशोक आत्रामची पत्नी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. घटनेची माहिती मिळताच, ती लगबगीने घरी पोहचली, तेव्हा अशोक रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. यासंदर्भात मृताची पत्नी पुष्पा आत्राम हिने मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी वसंता आत्राम याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार

 

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

 

 

Web Title: The elder brother killed the younger brother in a barn dispute pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.