शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 13:59 IST

घटनास्थळी उपस्थित लोकं दोघांमधील भांडण थांबवण्याऐवजी काढत होते व्हिडीओ

ठळक मुद्देपोलिसांकडून तपासाला सुरूवातशाळेत जात असताना आरोपीनं केली आपल्या चुलत भावाची हत्या

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एक व्यक्ती आपल्या छोट्या भावाचा ब्लेडनं गळा कापत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा लाईव्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सीकर जिल्ह्यातील दांतारामगढ येथे ही धक्कादायक घटना घडली. एका २१ वर्षीय तरूणानं आपल्या १० वर्षीय भावाचा भररस्त्यात ब्लेडनं गळा कापला आणि धक्कादायक म्हणजे आसपास उभी असलेली सर्व लोकं कोणीही त्याला मदत न करता त्याचा व्हिडीओ बनवत होते.दोन भावामध्ये झालेलं भांडण त्या ठिकाणी उभे असलेले अनेक लोक पाहत होते. परंतु अनेकांनी ते भांडण थांबवण्याऐवजी त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. या घटनेतच मोठ्या भावानं आपल्या लहान चुलत भावाचा गळा कधी कापला हेदेखील त्यांना समजलं नाही. ज्यावेळी रस्त्यावर लोकांना रक्ताचं थारोळं दिसलं त्यावेळी लोकांनी त्याच्या दिशेने पळापळ सुरू केली. परंतु तोवर उशिर झाला होता. १० वर्षीय मुलगा आपल्या घरातून आपल्या शाळेत मिळणारा पौष्टिक आहार घेण्यासाठी जात होता. परंतु त्याच वेळी त्याच्या चुलत भावानं त्याला पकडत भररस्त्यात त्याची गळा कापून हत्या केली. या घटनेनंतर त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आरोपीला पकडलं. या दरम्यान आरोपीनंदेखील मी याची गळा कापून हत्या केली आहे आणि पोलिसांनादेखील मी हेच सांगणार आहे असं म्हटलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांनादेखील या घटनेची माहिती दिली."आपले काका कायम आपली मजा उडवत होते. लहानपणी त्यांनी मला शिकूही दिलं नाही. मला काहीच येत नाही असं ते सतत म्हणायचे. म्हणून मी त्यांच्या मुलाचीच हत्या केली," असं आरोपीनं सांगितलं. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी हा अनेक दिवसांपासून त्या मुलाला मारण्याची तयारी करत असल्याचंही समोर आलं. तसंच दोन्ही कुटुंबांमध्येही वाद सुरू असल्याचंही तपासादरम्यान पुढे आलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानDeathमृत्यूPoliceपोलिस