उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या; गुंडांनी वापरली स्वयंचलित रायफल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:39 AM2020-07-04T04:39:19+5:302020-07-04T04:39:46+5:30

नागरिकासह सात जण जखमी, दोन गुंड ठार

Eight policemen killed in Uttar Pradesh; Automatic rifles used by thugs | उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या; गुंडांनी वापरली स्वयंचलित रायफल

उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या; गुंडांनी वापरली स्वयंचलित रायफल

Next

कानपूर : कुख्यात गुंड विकास दुबेच्या माणसांनी उपपोलीस अधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात नागरिकासह सात जण जखमी झाले. या हल्लेखोरांचे दोन सहकारी नंतर झालेल्या चकमकीत मारले गेले. दरम्यान, या गुंडांनी स्वयंचलित रायफलने पोलिसांवर गोळीबार केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुमारे ६० गुन्ह्यांची नोंद असलेल्या विकास दुबे याला अटक करण्यासाठी पोलिसांची तुकडी गुरुवारी रात्री येथून जवळ असलेल्या बिकरू खेड्यात गेली असताना घराच्या गच्चीवरून तिच्यावर गोळीबार केला गेला.

हल्ला करणाºयांनी मृत आणि जखमी पोलिसांची शस्त्रे हिसकावून पळ काढला. पोलिसांनी संपूर्ण भाग बंद करून हल्लेखोराचा शोध सुरू केल्यावर निवादा खेड्यात दुबेच्या माणसांसोबत चकमक उडाली. त्यात प्रेम प्रकाश आणि अतुल दुबे हे गुंड मारले गेले व त्यांनी हिसकावलेले पिस्टल ताब्यात घेतले. गुंडांच्या या टोळीच्या इतर सदस्यांचा व इतर शस्त्रांचा पोलीस शोध घेत आहेत. हिसकावलेल्या गेलेल्या शस्त्रांमध्ये एके-४७ रायफल, इन्सास रायफल, एक ग्लोक पिस्टल आणि दोन पॉर्इंट नऊ एमएमच्या पिस्टल्सचा समावेश आहे, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

पोलीस महानिरीक्षक (स्पेशल टास्क फोर्स) अमिताभ यश यांनी सगळ््यात आधी झालेल्या हल्ल्यात स्वयंचलित रायफल वापरली गेल्याचा दावा केला आहे. २०१७ मध्ये लखनौच्या कृष्णा नगरमध्ये एसटीएफने विकास दुबे याला अटक केली तेव्हा त्याच्याकडून ही रायफल जप्त केली गेली होती. ही रायफल नंतर न्यायालयाने कोणाच्या तरी हवाली करण्याचा आदेश दिला होता. या रायफल प्रकरणी आम्ही आणखी तपास करू, असे पोलिसांनी सांगितले. 

वाहनांतून पोलीस उतरताच अचानक गोळ्यांचा वर्षाव
विकास दुबेवर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस त्याला पकडण्यासाठी बिकरू खेड्यात गेले होते. दुबे याने २००१ मध्ये भाजपचे राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे नेते संतोष शुक्ला यांची पोलीस ठाण्यात हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार चौबेपूर पोलीस ठाण्यात विकास दुबे व इतर चार जणांविरुद्ध राहुल तिवारी याने दिली होती. पोलीस बिकरू खेड्यात जाणार याची माहिती त्याला असावी, असे राज्याचे पोलीस महासंचालक एच. सी.अवस्थी यांनी म्हटले. दुबेच्या लोकांनी पोलिसांना रोखण्यासाठी रस्ते बंद केले.

एका अडथळ्यापाशी वाहनांतून पोलीस उतरताच त्यांच्यावर अचानक गोळ्यांचा वर्षाव झाला. पोलिसांनी त्याला प्रत्त्युतर दिले; परंतु उपपोलीस अधीक्षक देवेंद्र मिश्र, तीन उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल्स ठार झाले.

Web Title: Eight policemen killed in Uttar Pradesh; Automatic rifles used by thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.