चाकण येथे आठ महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून पित्याने केला खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 05:11 PM2018-10-19T17:11:01+5:302018-10-19T17:12:38+5:30

पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण खून केला असल्याची घटना नाणेकरवाडी (ता.खेड ) येथील ज्योतिबानगरमध्ये घडली. 

eight month daughter murder by father in Chakan | चाकण येथे आठ महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून पित्याने केला खून 

चाकण येथे आठ महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून पित्याने केला खून 

ठळक मुद्देपित्यावर गुन्हा दाखल, बायकोसोबत झालेल्या भांडणातून केला खून 

चाकण : पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण खून केला असल्याची घटना नाणेकरवाडी (ता.खेड ) येथील ज्योतिबानगरमध्ये घडली. याप्रकरणी बाळाचा बाप चक उर्फ राजू सुरत सुनार ( वय २४, रा. ज्योतिबानगर, नाणेकरवाडी, चाकण, मूळ रा. गाबिश, जि. आछाम, नेपाळ ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी ( दि. १९ ) सकाळी पावणे सात ते साडे सातच्या दरम्यान घडली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल चक उर्फ राजू सुनार ( वय ८ महिने ) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत प्रवीण बब्रुवान झुंजार ( वय २९, रा. ज्योतिबानगर, नाणेकरवाडी, चाकण, मूळ रा. कवठळी, जि. सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण झुंजार यांच्या मालकीच्या खोलीत आरोपी राजू व त्याची पत्नी निर्मला हे आपल्या दोन मुलांसह भाड्याने राहत होते. नवरा बायकोचे भांडण झाल्यामुळे पत्नी निर्मला शुक्रवारी पहाटे दोन्ही मुलांना पतीजवळ सोडून कोठेतरी निघून गेली. याचा राग मनात आरोपीने आठ महिन्यांचा मुलगा साहिल यांस बाथरूमजवळील पाण्याच्या टाकीत टाकून बुडवून त्याचा खून केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सह पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: eight month daughter murder by father in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.