शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सुसाट वाहतुकीसाठी हवे प्रभावी नियाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 10:29 IST

मुंबईत १९७९ मध्ये वाहतूक विभागाचा पोलीस उपायुक्त म्हणून माझी नियुक्ती झाली तेव्हा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी योग्य सिग्नल यंत्रणा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य रणनीती आखल्यामुळे वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली.

- डॉ. पी. एस. पसरिचावाहतूक तज्ज्ञ, माजी पोलीस आयुक्त

सध्या सर्वत्र इन्फ्रास्ट्रक्चर, खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. परिणामी रहदारीत वाढ झाली. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत वेळोवेळी बदल करत ती अपडेट करणे गरजेचे आहे. खराब सिग्नल व्यवस्थापन वाहतुकीच्या समस्या वाढवते. सिग्नल यंत्रणेवर विविध सिग्नल टाइम प्लॅन उपलब्ध आहेत परंतु त्यांचा उपयोग होताना दिसत नाही. सिग्नल पॅटर्नच्या नियमित अभ्यासासह, दिवसाच्या विविध स्लॉटसाठी भिन्न सिग्नल वेळ असणे आवश्यक आहे. सध्या कोणताही पद्धतशीर दृष्टिकोन नाही. तसेच विभागांमध्ये समन्वय दिसून येत नाही. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत हाेईल.

मुंबईत १९७९ मध्ये वाहतूक विभागाचा पोलीस उपायुक्त म्हणून माझी नियुक्ती झाली तेव्हा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी योग्य सिग्नल यंत्रणा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य रणनीती आखल्यामुळे वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली. पुढे वाहतूक व्यवस्थापनाचा अभ्यास सुरू केला. जे शिकत होतो त्याचे प्रत्यक्षात प्रयोग सुरू केले. सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. देश, विदेशातून कौतुक झाले. पुढे यामध्ये पीएच.डी. घेतली. विदेशात जाऊन शिक्षण घेतले. याच अभ्यासातून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार केले. सुरुवातीला आम्हाला कायदेशीर दर्जा असलेली युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (UMTA) सारखी संस्था तयार करायची आहे. खासगी कारचा वापर कमी करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

 चांगल्या रस्त्यांच्या खुणा आणि चिन्हांसह गतिमान सिग्नल वेळेसह चांगले वाहतूक व्यवस्थापन लागू करणे आवश्यक आहे. यामुळे सुरक्षितता तसेच रहदारी सुधारेल आणि लोकही कायद्याचे पालन करतील. पार्किंग व्यवस्थेसाठी मोठ्या मैदानाखाली अंडरग्राउंड पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे.

सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी डी-मेरिटिंग प्रणालीसह प्रभावी ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली असावी. तरच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्सचे महत्त्व समजेल. ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याची प्रक्रिया संगणकीकृत असावी, जसे की पासपोर्टच्या बाबतीत आहे. पादचाऱ्यांना लहान अंतरासाठी चालण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले पदपथ उपलब्ध करून देणे आवश्यक आहेत.वाहतूक नियमाबाबत मुलांना पहिलीपासूनच शिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतुकीबाबत लहानपणापासून मुलांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण होईल. पुढे होणारे अपघात टाळण्यास मदत होईल.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस