सोशल मीडियातून मॉडेल हेरायचे, घरात शूटींग करायचे मग...; नोएडातील जोडप्यावर ED ची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 10:37 IST2025-03-30T10:36:49+5:302025-03-30T10:37:27+5:30

जोडप्याने एकूण कमाईचा जवळपास ७५ टक्के वाटा स्वत:कडे ठेवला होता आणि बाकी मॉडेल्सला दिला जायचा असं ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

ED raids Noida couple for spying on models on social media, shooting adlut content at home | सोशल मीडियातून मॉडेल हेरायचे, घरात शूटींग करायचे मग...; नोएडातील जोडप्यावर ED ची धाड

सोशल मीडियातून मॉडेल हेरायचे, घरात शूटींग करायचे मग...; नोएडातील जोडप्यावर ED ची धाड

नोएडा  - शहरातील एका जोडप्याच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. हे जोडपं त्यांच्या घरात मॉडेलसोबत अश्लील व्हिडिओ शूट करून ते सायप्रस येथील कंपनीला पुरवत होते. ज्या कंपनीला हे व्हिडिओ पाठवले जायचे ती जागतिक स्तरावरील पॉर्नोग्राफिक साईट्स होस्ट करते. ईडीने टाकलेल्या धाडीत ८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी नोएडा येथील सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या प्रमोटर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, ही कंपनी नोएडा येथील जोडप्याच्या मालकीची होती. या जोडप्यावर त्यांच्या घरी एडल्ट वेबकॅम स्ट्रिमिंग स्टुडिओ चालवण्याचा आरोप आहे. इथं व्हिडिओ शूट करून सायप्रसची कंपनी टेक्नियस लिमिटेडला पाठवले जायचे. ही कंपनी फेमस एडल्ट वेबसाईट्स Xhamster आणि Stripchat ऑपरेटर आहे. नोएडातील सबडिजी वेंचर्स आणि त्यांच्या संचालकांना सातत्याने परदेशी फंडिंग मिळत होते जे जाहिरात, मार्केट रिसर्च आणि जनमत सर्वेक्षण या नावावर घेतले जायचे परंतु तपासात ही रक्कम XHamster वर स्ट्रीम होणाऱ्या अश्लील व्हिडिओतून मिळत होते हे समोर आले.

एडल्ट कन्टेंटमधून झालेली कमाई सर्व्हिस फी म्हणून दाखवली जायची त्यामुळे हे FEMA कायद्याचं उल्लंघन मानले गेले. कंपनी आणि त्यांच्या संचालकांच्या बँक खात्यावर १५.६६ कोटी बेकायदेशीर रक्कम आढळली. त्याशिवाय नेदरलँडमध्येही बँक खाते असल्याचं निदर्शनास आले. ज्यात टेक्नियस लिमिटेड कंपनीकडून ७ कोटी रूपये ट्रान्सफर केलेत. परदेशी बँक खात्यातील ही रक्कम भारतात आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डचा वापर करून काढले जायचे. या जोडप्याने एकूण कमाईचा जवळपास ७५ टक्के वाटा स्वत:कडे ठेवला होता आणि बाकी मॉडेल्सला दिला जायचा असं ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, हे जोडपे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मॉडेलला चांगली ऑफर देऊन कामासाठी आकर्षिक करायचे. जेव्हा ईडीच्या पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली तेव्हा काही मॉडेल्सही तिथे उपस्थित होत्या. ज्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ईडी पुढील तपास करत असून आणखी काही आर्थिक व्यवहार आहेत का याचा शोध घेतला जात आहे. 

Web Title: ED raids Noida couple for spying on models on social media, shooting adlut content at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.