शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:05 IST

ED Raid Delhi: सध्या हा धनकुबेर फरार असून दुबईला लपला असल्याचे समजते आहे. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये १५ हून अधिक फसवणुकीचे धमकावण्याचे आणि जबरदस्तीने वसुलीचे गुन्हे दाखल आहेत.

नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिल्लीतील प्रथितयश नाव असलेल्या इंद्रजित सिंह यादव यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले. या कारवाईत ईडीच्या हाती 'कुबेराचे धन' लागले असून, तब्बल ५ कोटी रुपयांची रोकड आणि ८ कोटी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

इंद्रजित सिंह यादव यांच्याशी संबंधित दिल्लीतील विविध ठिकाणांवर ईडीच्या पथकाने मंगळवारी पहाटेपासूनच शोधमोहीम सुरू केली होती. आर्थिक गैरव्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. धाडीदरम्यान सापडलेली रोकड मोजण्यासाठी ईडीला मशीन मागवावे लागले होते. एवढेच नाही तर दागिन्यांचे वजन आणि त्यांची किंमत काढण्यासाठी देखील सोनाराला मशीनसह बोलवावे लागले होते. 

सध्या हा धनकुबेर फरार असून दुबईला लपला असल्याचे समजते आहे. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये १५ हून अधिक फसवणुकीचे धमकावण्याचे आणि जबरदस्तीने वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. 

जप्त करण्यात आलेली मालमत्ता:

रोख रक्कम: अंदाजे ५ कोटी रुपये (चलनी नोटांच्या बंडल्सच्या स्वरूपात).

दागिने: सुमारे ८ कोटी रुपये किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने.

कागदपत्रे: अनेक महत्त्वाच्या मालमत्तांची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे ईडीने ताब्यात घेतले आहेत.

तपासाची व्याप्ती वाढणार? इंद्रजित सिंह यादव यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने कोठून आले, याचा तपास आता ईडी करत आहे. या प्रकरणात काही बड्या नेत्यांची किंवा व्यावसायिकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीच्या या कारवाईमुळे दिल्लीतील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या ईडीचे अधिकारी जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करत असून, यादव यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या धाडीमुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कडक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ED Raid on Tycoon's Home: Crores in Cash and Jewelry Seized

Web Summary : ED raided Delhi businessman Indrajit Singh Yadav's properties, seizing ₹5 crore cash and ₹8 crore jewelry. Yadav, wanted in fraud cases, is reportedly in Dubai. Investigations continue into potential links with influential figures.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय