लॉकडाऊनदरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसावर दगडफेक, ६ जणांना ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 09:35 PM2020-04-08T21:35:22+5:302020-04-08T21:40:03+5:30

या हल्ल्याप्रकरणी सहा आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. 

During the lockdown, five people were arrested by police who attacked on police and stone pelting pda | लॉकडाऊनदरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसावर दगडफेक, ६ जणांना ठोकल्या बेड्या 

लॉकडाऊनदरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसावर दगडफेक, ६ जणांना ठोकल्या बेड्या 

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या पथकावर हल्ला झाला होता. इंदूरमधील चंदन नगर परिसरात हा प्रकार घडला. जावेद (25), इम्रान खान (24), नासिर खान (58), सलीम खान (50) आणि समीर अन्वर (22) यांना अटक करण्यात आली आहे.

इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूर येथे आरोग्य कर्मचार्‍यांच्या पथकावर आठवड्याभरापूर्वी दगडफेक केल्याचा प्रकार घडलेला असताना पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. या हल्ल्याप्रकरणी सहा आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. 

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यापासून थांबवण्यासाठी पोलिस यंत्रणेवर ताण येत आहे. मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या पथकावर हल्ला झाला होता. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान लॉकडाऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कॉन्सटेबवर दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इंदूरमधील चंदन नगर परिसरात हा प्रकार घडला. पोलीस अधीक्षक (पश्चिम) महेशचंद्र जैन यांनी सांगितले की, चंदन नगर भागात मंगळवारी संध्याकाळी कर्फ्यूचे उल्लंघन करून नागरिक घराबाहेर पडले असताना त्यांना घरी जाण्यास पोलिसांनी सांगितले. त्यानंतर या लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला आणि अचानक त्याच्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. पोलीस घटनास्थळावरून बाहेर पडले आणि सुरक्षितपणे स्वत: चा बचाव केला.


पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस दलास चंदन नगर भागात पाठविण्यात आली. जावेद (25), इम्रान खान (24), नासिर खान (58), सलीम खान (50) आणि समीर अन्वर (22) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.


याप्रकरणी जावेद आणि इम्रान या दोन मुख्य आरोपींवर रासुकाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी आम्ही जिल्हा प्रशासनाला शिफारस करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. शिवराजसिंह चौहान यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता.

Web Title: During the lockdown, five people were arrested by police who attacked on police and stone pelting pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app