प्रसूतीदरम्यान पत्नीला मिळाली पतीच्या मृत्यूची बातमी, आरजेडी नेत्याची हत्या  

By पूनम अपराज | Updated: December 26, 2020 21:06 IST2020-12-26T21:05:37+5:302020-12-26T21:06:47+5:30

Murder : एकीकडे त्या चिमुकलीचा आनंद तर दुसरीकडे एकुलता एक मुलगा रवी यांच्या मृत्यूच्या दुःखाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

During delivery, the wife received news of her husband's death, the murder of the RJD leader | प्रसूतीदरम्यान पत्नीला मिळाली पतीच्या मृत्यूची बातमी, आरजेडी नेत्याची हत्या  

प्रसूतीदरम्यान पत्नीला मिळाली पतीच्या मृत्यूची बातमी, आरजेडी नेत्याची हत्या  

ठळक मुद्देभोजपूरच्या आरा येथील शेहरी गावात राहणारा हरिद्वार सिंग याचा मुलगा आणि युवा नेता रवि यादव याला अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार मारले.

दोन दिवसांपूर्वी बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते रवि यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रवि यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली, त्याचवेळी त्यांच्या घरी त्यांची पत्नी प्रसूतीच्या वेदनेत होती. आता मृताच्या पत्नी प्रियांशु देवीने एका मुलीला जन्म दिला आहे. परंतु एकीकडे त्या चिमुकलीचा आनंद तर दुसरीकडे एकुलता एक मुलगा रवी यांच्या मृत्यूच्या दुःखाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


भोजपूरच्या आरा येथील शेहरी गावात राहणारा हरिद्वार सिंग याचा मुलगा आणि युवा नेता रवि यादव याला अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार मारले. गुरुवारी सकाळी  रामडीहरा  रोडच्या काठावरील  करहा  येथे रविचा मृतदेह सापडला. तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याच वर्षी रवीचे चारपोखरी पोलिस ठाण्यातील  दुलौर  गावच्या प्रियांशुशी लग्न झाले. प्रियांशु गर्भवती होती. पण, रवि यादव आपल्या मुलीला पाहण्यापूर्वीच या जगातून निघून गेला. एकीकडे अंत्ययात्रेची तयारी सुरु होती, तर दुसरीकडे पत्नीला प्रसूतीच्या वेदना असाह्य होऊ लागल्या होत्या. त्यानंतर प्रियांशुला गडहनी  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि तेथेच तिने एका मुलीला जन्म दिला.

मृत  रवी यादव बुधवारी संध्याकाळी मंदुरी येथील आपल्या घरातून मोटारसायकलने घरी येण्यास निघाल्याची माहिती आहे. पण उशीरापर्यंत ते घरी पोहोचला नाही. कुटुंबीयांनी तपास सुरू केला असता गुरुवारी सकाळी मोटारसायकलसह रविचा मृतदेह गावाजवळ पडला. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन तीन खोके देखील जप्त करण्यात आल्या असून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचा संशय आहे.


घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी, स्थानिक लोकांनी आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी आणि  त्यांच्या मागण्यांसाठी मृतदेहासह आरा-सासाराम राज्य महामार्ग रोखला होता. मात्र, डीएसपीने मारेकऱ्यांना अटक करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर जाम झालेला महामार्ग खुला करण्यात आला. यानंतर मृतदेह आरा सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याक्षणी अद्याप हत्येच्या गुन्ह्याची उकल झालेली नाही. पोलीस तपास सुरू आहे. याप्रकरणी अज्ञात लोकांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: During delivery, the wife received news of her husband's death, the murder of the RJD leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.