शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलांची फसवणूक करणारा जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:01 IST

७ हून अधिक महिलांना गंडा, विमानतळ पोलिसांची कारवाई

मुंबई - घटस्फोटित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या ठगाला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महेश कुलकर्णी असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत ७ हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईचा रहिवासी असलेला कुलकर्णी हा विविध विवाह नोंदणी संकेतस्थळांवरून घटस्फोटित महिलांची माहिती मिळवायचा. स्वत: उद्योगपती असल्याचे भासवून त्यांच्याशी ओळख वाढवायचा. मुंबईसह गोव्यात हॉटेल असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन करायचा. पुढे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्याने अशाच प्रकारे बंगळुरू येथील एका उद्योजक महिलेशी ओळख केली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. विमानाच्या प्रवासाला कंटाळल्याचे सांगून तिची कार घेतली. महिलेने विश्वास ठेवून तिची महागडी कार त्याला दिली. ती कार घेऊन तो मुंबईत आला. त्यानंतर त्याने तिचे फोन उचलणे बंद केले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने अनोखी शक्कल लढवली. 

तिने २५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्याला अनोळखी क्रमांकावरून कॉल केला. भेटण्यासाठी विमानतळ परिसरात बोलावून घेतले. तोही लालसेपोटी कार घेऊन तेथे धडकला. महिलेने तो येण्यापूर्वी तेथील पोलिसांना त्याच्याबाबत सांगितले होते. तो येताच तिने त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा बनाव उघडकीस आला. त्याने आतापर्यंत ७ महिलांना साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्याने आतापर्यंत अशा प्रकारे शेकडो महिलांना गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने ते अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नfraudधोकेबाजी