शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी कमी व्याजदराचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १९ लाखाचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 14:37 IST

Fruad : मुंबई येथून तिघांना  अटक : ५ लाखाची रोकड हस्तगत

ठळक मुद्देअटक करण्यात आलेल्यांमध्ये अली मोहम्मद मुमताज (भांडूप वेस्ट, मुंबई), अविनाश हनुमंत वांगडे (रा.लोकमान्य नगर, ठाणे) व रविराज शंकर डांगे (रा.मुलुंड, मुंबई) यांच्यासह दिल्ली येथील सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

जळगाव : दुग्धव्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून पिंपळगाव हरेश्वर (ता.पाचोरा) येथील शेतकऱ्याला १९ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पदार्फाश केला असून मुंबई येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. याआधी दिल्लीच्या दोन जणांना अटक झाली होती, आता पुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून ४ लाख ९० हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अली मोहम्मद मुमताज (भांडूप वेस्ट, मुंबई), अविनाश हनुमंत वांगडे (रा.लोकमान्य नगर, ठाणे) व रविराज शंकर डांगे (रा.मुलुंड, मुंबई) यांच्यासह दिल्ली येथील सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप विठ्ठल महाजन (४६, रा.पिंपळगाव, हरेश्वर, ता.पाचोरा) या शेतकऱ्याला दुग्धव्यवसाय सुरु करावयाचा असल्याने त्यांनी ७५ लाखाचे कर्ज काढण्यासाठी पाचोरा येथील एका बँकेशी संपर्क साधला होता, मात्र शाखा व्यवस्थापकाने इतकी रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महाजन यांना बजाज फायनान्सच्या मुंबई कायार्लयातून  व्यवस्थापक कबीर अग्रवाल बोलत असल्याचे सांगून एकाने मोबाईलवर संपर्क साधला. तुम्हाला कजर् मिळेल, मात्र त्याबदल्यात ४ लाखाची विमा पॉलीसी काढावी लागले त्याचे सर्व फायदे मिळतील तसेच ४० लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते, असे सांगून चार वेळा चार बँकामध्ये १२ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन भरायला लावले. त्यानंतर मुंबई बोलावून ६ लाख रुपये घेतले. महाजन यांनी एकूण १८ लाख ४९ हजार रुपये या टोळीकडे भरले. इतकी रक्कम दिल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता.

फेब्रुवारीत दिल्ली येथून दोघांना अटकगुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी उपनिरीक्षक अंगद नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे, अरविंद वानखेडे व श्रीकांत चव्हाण  यांचे पथक दिल्ली रवाना केले होते. या पथकाने दोन दिवस सापळा रचला व सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता या दोघांना तेथून अटक केली. याकामात सहायक फौजदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांची मेहनत कामात आली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली होती, मात्र नंतर लॉकडाऊनमुळे दिल्ली जाणे शक्य झाले नाही. आता परत पथकाने  चौकशी केली असता मुंबईतून काही कॉल झाल्याचे लक्षात आल्याने  उपनिरीक्षक अंगद नेमाणे, गौरव पाटील व ललीत नारखेडे यांनी मुंबई गाठली. तेथून रविवारी अली मोहम्मद मुमताज, अविनाश हनुमंत वांगडे व रविराज शंकर डांगे  या तिघांना अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना जळगावात आणण्यात आले. या संशयितांकडून चार एटीएम कार्ड व ४ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकJalgaonजळगावFarmerशेतकरीPoliceपोलिस