घरात वाद झाल्याने मुलगी निघाली, तरुणाने घरी सोडण्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला
By पंकज शेट्ये | Updated: July 6, 2023 17:20 IST2023-07-06T17:19:58+5:302023-07-06T17:20:21+5:30
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शाळेत शिकणाºया त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन दिवसापूर्वी बलात्काराची घटना घडली.

घरात वाद झाल्याने मुलगी निघाली, तरुणाने घरी सोडण्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीने घरी सोडण्याचे सांगून तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलीसांनी ३३ वर्षीय लक्षीमण बसप्पा लमाणी नामक तरुणाला अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी त्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर घाबरलेल्या मुलीने एक दिवस सोडून परिवाराला तिच्यावर घडलेल्या वाईट प्रसंगाची माहीती दिल्यानंतर परिवारातील सदस्यांने वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलीसांनी त्या प्रकरणात त्वरित कारवाई करून गुरूवारी (दि.६) पहाटे ४ नंतर लक्षीमण लमाणी याला अटक केली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शाळेत शिकणाºया त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन दिवसापूर्वी बलात्काराची घटना घडली. त्या दिवशी सकाळी ती मुलगी प्रथम एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाबरोबर घरातून पळून गेली होती अशी माहीती पोलीसांना प्राप्त झाली आहे. त्यानंतर त्याच दिवशी ती घरी परतली असता काही मुद्यावरून मुलीची घरातील काही सदस्यांबरोबर वाद निर्माण झाल्यानंतर ती पुन्हा घरातून बाहेर निघून गेली. त्यानंतर ती एका ठीकाणी रस्त्याच्या बाजूला उभी असता झुआरीनगर, साकवाळ येथे राहणारा ३३ वर्षीय लक्षीमण लमाणी नामक तरुण तिच्याशी गेला. त्यांने तिला दुचाकीवरून घरी पोचवणार असल्याचे सांगितल्यानंतर ती त्याच्याबरोबर दुचाकीवरून निघून गेली. लक्षीमण त्या अल्पवयीन मुलीला तिच्या घरी सोडण्याऐवजी तिला एका अज्ञात स्थळावर घेऊन गेला. तेथे त्यांने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याबरोबरच तिच्यावर बलात्कार केल्याची माहीती पोलीसांनी दिली.
बलात्कार केल्यानंतर लक्षीमणने त्या अल्पवयीन मुलीला घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जिवंत मारण्याची धमकी दिल्याचे पोलीसांनी सांगितले. बलात्कार करून जिवंत मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर तिच्यावर घडलेल्या वाईट प्रसंगाची माहीती कोणालाच दिली नाही. दुसºया दिवशी तिने आपल्या परिवारातील सदस्यांना घडलेल्या वाईट प्रसंगाची माहीती दिल्यानंतर त्यांनी वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करून बलात्कार करणाºया लक्षीमण लमाणी याला ताब्यात घेतला. तसेच त्याच्याविरुद्ध भादस ३६३, ३७६, ३५४ - ए, ५०६(२) कलमाखाली तसेच गोवा चिर्ल्डंन्स एक्ट च्या ८ (२) कलमाखाली आणि पोक्सो कायद्याच्या ४, ६, ८, १२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला गुरूवारी पहाटे ४ नंतर अटक केली. बलात्कार घडलेल्या दिवशी ती अल्पवयीन मुलगी तिच्या एका १७ वर्षीय मित्राबरोबर (मुलगा) घरातून पळून गेली होती अशी माहीती पोलीसांना मिळाल्याने पोलीस त्या अल्पवयीन मुलाशी विविध विषयांवर चौकशी करणार असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. वेर्णा पोलीस अधिक तपास करित आहेत.